मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी बिकानेर इथल्या भारतीय कृषी संशोधन परिषद-राष्ट्रीय संशोधन केंद्रात उंटविषयक उत्पादन प्रक्रिया आणि प्रशिक्षण विभागाचे केले उद्घाटन

Posted On: 06 MAR 2023 8:57AM by PIB Mumbai

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी काल राजस्थान मधल्या बिकानेर इथं भारतीय कृषी संशोधन परिषद, अर्थात ICAR केंद्रात ‘उंट विषयक उत्पादन प्रक्रिया वापर आणि प्रशिक्षण विभागाचं उद्घाटन केले. ICAR - बिकानेर हे कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत असणारी स्वायत्त संस्था असून या क्षेत्रातील एक प्रमुख संशोधन केंद्र आहे.

या क्षेत्राकडे असलेल्या अफाट संधींचा विचार करून केंद्रातील उत्पादन प्रक्रिया उपयोग आणि प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

 

 यावेळी परशोत्तम रुपाला यांनी संशोधन केंद्रात पशुपालक आणि ग्रामीण भागातल्या जनतेशी संवाद साधला. त्यानंतर रुपाला यांनी संस्थेच्या सुविधा केंद्रांना भेट दिली आणि शास्त्रज्ञ आणि या संबंधीत तज्ञांशी संवाद साधला. या उत्पादन प्रक्रिया शाखेच्या स्थापनेचे महत्त्व आणि ग्रामीण समुदायाला त्याचा फायदा कोणत्या मार्गांनी होईल यावर सखोल चर्चा करण्यात आली. ‘पशुसंवर्धन क्षेत्र आर्थिक वाढ आणि ग्रामीण उत्पन्नाचे वैविध्यपूर्ण साधनांपैकी एक म्हणून उदयास येत असताना, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, सार्वजनिक गुंतवणूक आणि धोरणात्मक सुधारणांची गरज आहे, यावर रुपाला यांनी भर दिला.

उद्घाटन सत्रानंतर, रुपाला यांनी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सवालाही भेट दिली. भारतीय अस्मितेचे जतन, प्रचार आणि लोकप्रियता वाढवणे आणि नवीन पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडणे, तसंच विविधतेतील एकतेची आपली सौम्य शक्ती देश आणि जगाला दाखवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे, असं रुपाला यांनी स्पष्ट केलं.

***

JaideviPS//DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1904511) Visitor Counter : 141