कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेतकऱ्यांचे हित सर्वोपरि आहे, चांगल्या प्रतीच्या बियाण्यांसाठी सरकार लवकरच बियाण्यांचा माग काढणारी सीड ट्रेसिबिलिटी व्यवस्था सुरू करणार -  तोमर

Posted On: 04 MAR 2023 10:41PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारसाठी शेतकऱ्यांचे हित सर्वोपरि असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. या दिशेने आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, मोदी सरकार लवकरच बियाण्यांचा माग काढणारी सीड ट्रेसेबिलिटी व्यवस्था सुरू करणार आहे. यामुळे बियाणे व्यापार क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा बसेल. भारतीय राष्ट्रीय बियाणे संघटने तर्फे  आज दिल्लीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय भारतीय बियाणे महासभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री तोमर यांनी ही माहिती दिली.

तोमर म्हणाले की, सीड ट्रेसेबिलिटी  संबंधितांकडून  सूचना घेण्यात आल्या आहेत. ते सुरू केल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच बियाणे क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या सर्व लोकांना होईल आणि बियाणे क्षेत्र योग्यरित्या चालेल याची खात्री होईल आणि त्या  दिशेने योग्य वाटचाल केली जाईल. बियाणे क्षेत्र सुरळीत चालण्याच्या मार्गात कितीही अडथळे येत असले तरी सरकार याबाबतीत अत्यंत गंभीर आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे पहिले सरकार आहे ज्याने देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या काळात अप्रासंगिक झालेले कायदे रद्द केले आहेत. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत पंतप्रधान मोदी यांनी कठोर निर्देश दिले आहेत आणि असे सुमारे दीड हजार कायदे रद्द केले आहेत, जेणेकरून त्यांचा कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध गैरवापर होऊ नये. देशातील व्यापार-उद्योग क्षेत्र नीट आणि न घाबरता चालणे आवश्यक आहे आणि मोदी सरकारने ते करून दाखवले आहे. मोदी सरकारने पहिल्यांदाच देशातील करदात्यांचे आभार मानले आहेत, तसेच सर्व घटकांच्या हितासाठी कायदेशीर सुधारणा करून देशातील सर्व वर्गांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. यावरून सरकारची दूरदृष्टी दिसून येते. येत्या काळात आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर परस्पर विश्वासाचे हे वातावरण केवळ सुधारावे लागेल असे नाही तर ते अधिक दृढ करावे लागेल, जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला असेल तर नक्कीच आपणही  कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाही.

तोमर म्हणाले की, आपले कृषी क्षेत्र समृद्ध असून हे क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारत कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे, तरीही तेलबिया, कापूस यासारख्या काही क्षेत्रांमध्ये, ज्यामध्ये आपण अद्याप स्वयंपूर्ण होऊ शकलो नाही.यासाठी बियाणे क्षेत्राच्या संबंधितांनीही आयात कमी करून देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे. या दिशेने बियाणे उद्योगांनी आराखडा तयार करून त्यावर काम करणे आवश्यक आहे. तोमर म्हणाले की, येणारा काळ  भारतासाठी खूप भाग्यमय असणार आहे. जगातील राजकीय परिस्थिती, भारताची विश्वासार्हता आणि आपले महत्त्व आज जगाच्या राजकीय व्यासपीठांवर  जेवढे पूर्वी कधीही नव्हते ते सर्वांनी पाहिले आहे . आज जगाच्या मोठ्या भागाला भारताकडून अपेक्षा आहेत. पंतप्रधान  मोदी यांच्या कार्यक्षम आणि कणखर नेतृत्वामुळे आणि देशाच्या प्रगतीत सर्वांचे योगदान यामुळे ही चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून भारताने वेगाने पावले उचलली आहेत, तर प्रधानमंत्री गति शक्ती कार्यक्रम उद्याच्या विकसित भारताचा पाया मजबूत करणार आहे. 2050 सालापर्यंत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन, तसेच हवामानाच्या आव्हानांना तोंड देत देश आणि जगाच्या अपेक्षित गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर राहण्याची जबाबदारी कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या सर्वांची आहे. बदल घडवून आणणे आणि समस्या सोडवताना देशाला अग्रस्थानी आणणे, हे देखील आपल्या सर्वांच्या आराखड्मयामध्ये समाविष्ट केले पाहिजे. कृषी क्षेत्राच्या सातत्यपूर्ण प्रगतीमध्ये बियाणे क्षेत्राच्या योगदानाचे कौतुक करून तोमर म्हणाले की, बियाणे ही निर्मिती आहे, बियाणाचा विकास हा जगाचा विकास आहे. शेत कोणतेही असो, बियाणे महत्त्वाचे असते, कोणत्याही शेतासाठी बियाण्याची गुणवत्ता निश्चितच अत्यंत महत्त्वाची असते. कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा, त्याचा विकास, संख्यात्मक वाढ, शेतकरी वापर करणे आणि इतर लोकांनी वापर करणे, हा मोठा प्रवास आहे, या प्रवासात सहभागी होणारे लोक आपला व्यवसाय तर करत आहेतच पण त्याच बरोबर त्यांची या क्षेत्राविषयक जबाबदारीही खूप महत्त्वाची आहे, जी सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. तोमर यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेशी  संलग्न सर्व संस्थांच्या शास्त्रज्ञांच्या हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धनयुक्त जातीच्या आणि  बियाण्याच्या इतर चांगल्या जाती विकसित करण्यात दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. यावेळी  तोमर यांनी "सीड्स फॉर ग्लोबल युनिटी वॉल"चे अनावरण केले. यावेळी  भारतीय राष्ट्रीय बियाणे संघटनेचे   पदाधिकारी .एम. प्रभाकर रावदिनेश पटेल, वैभव काशीकर, डॉ. बी.बी. पटनायक, आर.के. त्रिवेदी यांची उपस्थिती होती.

***

G.Chippalkatti/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904273) Visitor Counter : 217


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu