रसायन आणि खते मंत्रालय
जनऔषधी रेल्वेला आज नवी दिल्लीत डॉ. मनसुख मांडवीय आणि अश्विनी वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना
पुणे ते दानापूर रेल्वेही रवाना
Posted On:
03 MAR 2023 7:39PM by PIB Mumbai
जनौषधीचा प्रसार करण्यासाठी आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत जन औषधी रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. (छत्तीसगड संपर्कक्रांती एक्सप्रेस) 9000 हून अधिक केंद्रांद्वारे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या जनऔषधी (जेनेरिक) औषधांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या गाडीच्या माध्यमातून जनऔषधी योजनेचे ब्रँडिंग करण्यात आले आहे. ही ट्रेन 2 महिन्यांमध्ये 4 हून अधिक राज्यांमध्ये प्रवास करेल.

याचवेळी जनऔषधी योजनेबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे ते दानापूर ही 4 राज्यांतून प्रवास करणारी अशाचप्रकारची ट्रेन 2 महिन्यांसाठी रवाना झाली.

यावर्षी तिसरा जनऔषधी दिवस देशभरात साजरा करण्यासाठी ‘जनऔषधी - एक कदम मातृ शक्ती की ओर’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 34 ठिकाणी जनऔषधी केंद्रांवर महिला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत. अनेक ठिकाणी महिला लोकप्रतिनिधी, महिला डॉक्टर, एनजीओ यांच्या उपस्थितीत संवाद साधला गेला आणि जनऔषधी औषधांच्या आरोग्य लाभांविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. मासिक पाळीतील आरोग्याबाबत विशेष चर्चाही करण्यात आली. 3500 हून अधिक महिलांना महिला-केंद्रित उत्पादने असलेल्या संचाचे विविध ठिकाणी वाटप करण्यात आले.
***
S.Bedekar/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904082)
Visitor Counter : 162