संरक्षण मंत्रालय
स्वदेशी बनावटीची पहिल्यांदाच खाजगीरित्या उत्पादित केलेली एएसडब्ल्यू रॉकेट फ्यूज भारतीय नौदलाकडे सुपूर्द
Posted On:
03 MAR 2023 7:05PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाला आज प्रथमच एका खाजगी भारतीय उद्योगाद्वारे निर्मित पाण्याखालील रॉकेट आरजीबी 60 साठी पूर्णतः स्वदेशी बनावटीची फ्यूज वायडीबी-60 मिळाली आहे.
शस्त्रास्त्र आणि दारुगोळा उत्पादनात आत्मनिर्भरतेला मोठी चालना देण्यासाठी, युद्धनौकांमधून वापरल्या जाणार्या पाण्याखालील पाणबुडीविरोधी लढाऊ(एएसडब्ल्यू) रॉकेट आरजीबी-60 साठी ही फ्यूज नागपूरच्या मेसर्स इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड (इइएल) या खाजगी कंपनीनं तयार केली आहे. खाजगी उद्योगाकडे पाण्याखालील दारूगोळा फ्यूजसाठी पुरवठा मागणी नोंदविण्याची देण्याची ही पहिलीच वेळ असेल.
ईईएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सत्यनारायण नुवाल यांनी ही फ्यूज व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ व्हाईस अॅडमिरल एसएन घोरमाडे यांच्याकडे सुपूर्द केली.
"शस्त्रे आणि दारुगोळा निर्मितीमध्ये खाजगी उद्योगांचा वाढता सहभाग कौतुकास्पद आहे आणि यामुळे सशस्त्र दलाच्या आत्मनिर्भरताला मोठी चालना मिळत आहे. खाजगी उद्योगांद्वारे प्रथमच सिम्युलेटेड डायनॅमिक चाचणी सुविधेचा वापर करून अशा प्रकारच्या फ्यूजचा विकास आणि निर्मिती करणे ही देशासाठी मोठी उपलब्धी आहे.", असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आत्मनिर्भरता'च्या अनुषंगाने भारतात दारूगोळा आणि फ्यूजच्या निर्मितीसाठी परिसंस्था निर्माण करण्यासाठी उत्पादक कंपनीला सर्व तांत्रिक साहाय्य नौदल शस्त्रास्त्र महासंचालनालय (डीजीओएनए) आणि नौदल शस्त्रास्त्र तपासणी महासंचालनालय (डीजीएनएआय), भारतीय नौदलाने प्रदान केले आहे.
***
S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904064)
Visitor Counter : 199