युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शाळकरी मुले आणि शिक्षकांमध्ये मूल्याधारित क्रीडा शिक्षण मजबूत करण्यासाठी नाडा आणि एनसीईआरटी यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

प्रविष्टि तिथि: 03 MAR 2023 6:29PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सी (नाडा) ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेली स्वायत्त संस्था आणि शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी), शाळकरी मुले आणि शिक्षकांमध्ये मूल्याधारित क्रीडा शिक्षण मजबूत करण्यासाठी आज  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. शिक्षण मंत्रालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या क्रीडा विभागाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी , शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार, शिक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव लामचोंघोई स्वीटी चांगसान, नाडाच्या महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रितू सैनक्रीडा विभागाचे संचालक विमल आनंद, एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश प्रसाद साकलानी आणि केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (सीआयईटी) – एनसीईआरटीचे  सह संचालक प्रा अमरेंद्र बेहेरा यावेळी उपस्थित होते. 

क्रीडा विभागाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी यांनी बीजभाषण केले. "तरुण खेळाडूंना वयाच्या पुढच्या टप्प्यात चांगल्या खेळाचा सराव करता यावा यासाठी लहानपणापासूनच सकारात्मक क्रीडा मूल्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे.", असे त्यांनी सांगितले.

या सामंजस्य कराराद्वारे हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांमध्ये क्रीडा मूल्ये आणि प्रामाणिकपणा, विविधता, समानता, निष्पक्ष खेळ, आदर आणि सांघिक भावना यासारख्या नीतीमूल्यांवर आधारित ई-सामग्री उपलब्ध आणि विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) मूल्यांवर आधारित क्रीडा शिक्षण टूलकिटचा वापर प्रत्येक वर्गात करण्याला चालना दिली जाणार आहे.

***

S.Bedekar/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1903988) आगंतुक पटल : 214
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी