संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद ; ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत स्वदेशी संरक्षण उत्पादनाला  सरकारचे प्राधान्य असल्याचे केले अधोरेखित


राजनाथ सिंह यांनी इस्रायलमधील उद्योगांना संयुक्त उपक्रमांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी तसेच महत्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये सहकार्याची क्षेत्रे निवडण्यासाठी आमंत्रित केले

Posted On: 03 MAR 2023 6:27PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 3 मार्च 2022 रोजी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. उभय मंत्र्यांमधील ही पहिली चर्चा होती. गॅलेंट यांची इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी  त्यांचे अभिनंदन केले.

आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत संरक्षण उपकरणांचे स्वदेशीकरण आणि देशांतर्गत उत्पादनाला सरकारचे प्राधान्य असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.

भारतात एक मजबूत आणि जागतिक दर्जाच्या संरक्षण उत्पादन परिसंस्थेच्या वाढीसाठी  इस्रायली उद्योगांच्या सहकार्याची त्यांनी दखल घेतली  आणि इस्रायली उद्योगांना भारतीय कंपन्यांसोबतच्या संयुक्त उपक्रमांमध्ये त्यांची गुंतवणूक अधिक विस्तारण्यासाठी तसेच महत्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये सहकार्याची क्षेत्रे निवडण्यासाठी आमंत्रित केले.  नुकत्याच संपलेल्या एरो इंडिया 2023 दरम्यान भारतीय आणि इस्रायली कंपन्यांमध्ये काही महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रदेशातील  भारताची सकारात्मक भूमिका अधोरेखित केली  आणि दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी इस्रायल सरकार उत्सुक असल्याचे सांगितले.  दोन्ही मंत्र्यांनी गेल्या वर्षी मान्यता दिलेल्या  ‘व्हिजन स्टेटमेंट’च्या चौकटीअंतर्गत  द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

***

S.Bedekar/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1903980) Visitor Counter : 155


Read this release in: English , Urdu , Hindi