वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग मंत्रालय हॅन्डलूम हाट येथे आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करून जागतिक महिला दिन करणार साजरा
Posted On:
03 MAR 2023 5:55PM by PIB Mumbai
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वस्त्रोद्योग मंत्रालय,नवी दिल्लीत जनपथ स्थित हँडलूम हाट येथे आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. हातमाग आणि हस्तकला क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत, शिवाय मोठ्या संख्येने लोकांना, विशेषतः महिलांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात हातमाग विणकर महिला, हस्तकला कारागीर, उद्योजिका आणि डिझायनर्स 75 स्टॉल्स उभारणार आहेत. यापैकी अनेक कुशल कारागीर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत तसेच महिलांनी स्थापन केलेल्या अथवा त्यांच्या नेतृत्वाखालील संस्था आहेत.
हस्तकला आणि हातमाग क्षेत्र हे असंघटित क्षेत्र असून सुमारे उदरनिर्वाह करतात. हातमाग क्षेत्रातील 25.46 लाख महिला आणि हस्तकला क्षेत्रातील 20 लाख महिलांसह देशभरातील 65 लाख कारागीर आणि विणकरांना उपजीविका पुरवते.
आजपर्यंत 20 महिला कारागिरांना शिल्प गुरू आणि 181 महिला कारागिरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हस्तकलेसाठी केवळ महिला कारागिरांसाठी वार्षिक 5 राष्ट्रीय पुरस्कार राखीव आहेत.
6 महिला विणकरांना संत कबीर पुरस्कार तर 73 महिला विणकरांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात करण्यात आले आहे. कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार केवळ महिला विणकरांच्या सन्मानार्थ दिला जातो.
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1903952)