आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण

भारतातील गिफ्ट सिटीत आंतरराष्ट्रीय शाखा संकुल उभारणारे डीकिन विद्यापीठ हे पहिले परदेशी विद्यापीठ ठरले

Posted On: 03 MAR 2023 3:41PM by PIB Mumbai

 

ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख विद्यापीठ असलेले डीकिन विद्यापीठ हे गुजरातमध्ये गिफ्ट-आयएफएससी, गिफ्ट सिटीत आंतरराष्ट्रीय शाखा संकुल (आयबीसी) उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची (आयएफएससीए) मान्यता प्राप्त करणारे पहिले परदेशी विद्यापीठ ठरले.

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये घोषित केले होते की, “गिफ्ट सिटीमध्ये जागतिक दर्जाच्या परदेशी विद्यापीठांना आणि संस्थांना आर्थिक सेवा आणि तंत्रज्ञानासाठी उच्च दर्जाच्या मानवी संसाधनांची उपलब्धता सुलभ करण्यासाठी आयएफएससीए वगळता देशांतर्गत नियमांशिवाय, वित्तीय व्यवस्थापन, फिनटेक, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील अभ्यासक्रमांची परवानगी दिली जाईल.”

गिफ्ट सिटी कंपनी लिमिटेड ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीच्या आधारे आयएफएससीए ने डीकिन विद्यापीठाला तत्वतः मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे, डीकिन विद्यापीठ भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि वित्तीय व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये करता येत असलेले पदवी अभ्यासक्रम गिफ्ट आयएफएससी मध्ये देऊ शकेल.

***

S.Bedekar/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1903894) Visitor Counter : 230