वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

ई-व्यवहारांद्वारे स्टार्ट-अप्स, महिला आणि तरुणांच्या हिताला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारच्या ई-मार्केटप्लेस (GeM) वरील "स्वायत्त (SWAYATT)" उपक्रमाच्या यशाचे स्मरण करण्यासाठी नवी दिल्ली इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 01 MAR 2023 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023

केंद्र सरकारच्या ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलवरील ई-व्यवहारांच्या माध्यमातून, स्टार्ट-अप, महिला आणि तरुणांच्या हिताला प्रोत्साहन देणाऱ्या ‘स्वायत्त (SWAYATT)’ या उपक्रमाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर,नवी दिल्ली इथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या सचिव राधा एस चौहान या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाच्या सहसचिव मर्सी इपाओ आणि SFAC या शेतकरी उत्पादक संघटनांचे प्रतिनिधित्व करणा-या  संस्थेचे संचालक संजीव गौतम यावेळी  पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

68 लाख आणि त्यापेक्षा जास्त मागण्यांद्वारे, 1.87 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करण्यात यश मिळवणाऱ्या, 8.5 लाखांपेक्षा जास्त सूक्ष्म आणि लघु उद्योगांची  (MSEs) GeM पोर्टलवर  नोंदणी करून, सामाजिक आणि आर्थिक समावेशानाला प्रोत्साहन दिले आहे.  या प्रगतीची माहिती, GeM चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. के. सिंह यांनी उपस्थितांना दिली.  ते पुढे म्हणाले की, GeM पोर्टलवर आतापर्यंत 1.45 लाखांहून अधिक महिला एमएसईंनी 15,922 कोटींच्या 7.32 लाख मागण्या पूर्ण केल्या आहेत, तर अंदाजे 43 हजार एससी/एसटी/ एमएसईनी 2,592 कोटी किमतीच्या 1.35 लाखापेक्षा जास्त मागण्या पूर्ण केल्या आहेत.

यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या राधा एस चौहान यांनी, एमएसई, महिला, दिव्यांगजन आणि आदिवासी उद्योजक, स्टार्टअप, बचत गट, कारागीर आणि विणकर यासारख्या दुर्लक्षित विक्रेत्या गटांची उपस्थिती वाढवण्यासाठी , आणि सरकारी खरेदी प्रक्रियेमध्ये त्यांना थेट प्रवेश देण्यासाठी GeM कडून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. GeM च्या माध्‍यमातून  2016-17 मधील रु 422 लाख कोटींच्या मागण्या नोंदवल्या गेल्या होत्या.सध्या  रु. 1.70 लाख कोटी (फेब्रुवारी 2023 पर्यंत) मागण्‍या पोचल्या आहेत, या प्रवासाची त्यांनी विशेष नोंद घेतली.

 
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1903490) Visitor Counter : 182


Read this release in: English , Urdu , Hindi