प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष आणि विश्वस्त बिल गेट्स यांनी प्रा. अजय सूद यांची घेतली भेट
Posted On:
01 MAR 2023 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2023
गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष आणि विश्वस्त बिल गेट्स यांनी भारत सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या कार्यालयाला भेट दिली. प्रा. अजय के सूद यांना भेटून गेट्स यांनी प्राधान्यक्रम समजून घेतले आणि पुढील सहकार्यांबाबत जाणून घेतले.
त्यांच्या भेटीदरम्यान, प्रा. सूद यांनी पीएसएच्या कार्यालयाच्या कार्याची माहिती दिली. राष्ट्रीय आरोग्य अभियान, क्वांटम तंत्रज्ञान, उपजिविका, हरित हायड्रोजन, एक राष्ट्र एक सबस्क्रिप्शन इत्यादींचा यात समावेश होता. फाउंडेशनसोबत आरोग्य अभियान (वन हेल्थ मिशन), कचऱ्यातून संपत्ती निर्माण प्राधान्यक्रम यावर मुख्यत्वे चर्चा केंद्रित होती.
विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांवर लक्ष केंद्रित केल्याबद्दल गेट्स यांनी कौतुक केले. भारत सरकारच्या आगामी वन हेल्थ मिशन संदर्भातील प्रयत्नांना आणि रोग नियंत्रणासाठी पर्यावरणीय देखरेख ठेवण्याच्या शक्तीला पाठबळ देण्यासाठी त्यांनी स्वारस्य व्यक्त केले. प्राण्यांचे आरोग्य, रोगाचे प्रारुपीकरण आणि नवीन निदान तंत्रज्ञान यावर त्यांनी नवकल्पनांच्या गरजेवर भर दिला. या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतासाठी असलेल्या संधीवरही त्यांनी भर दिला.
गेट्स यांच्यासमवेत यावेळी ग्लोबल हेल्थचे अध्यक्ष डॉ ट्रेव्हर मुंडेल, भारतातील संचालक हरी मेनन आणि डिजिटल आणि आरोग्य नवोन्मेषाच्या उपसंचालक हरीश अय्यर होते. पीएसए कार्यालयाच्या वैज्ञानिक सचिव डॉ (श्रीमती) परविंदर मैनी; डॉ प्रीती बंजाल;सल्लागार/शास्त्रज्ञ 'जी'; डॉ मोनोरंजन मोहंती, सल्लागार/शास्त्रज्ञ 'जी'; डॉ केतकी बापट, सल्लागार/शास्त्रज्ञ 'जी'; डॉ सिंदुरा गणपती, पीएसएचे पाहुणे फेलो; डॉ. सपना पोटी, संचालिका, स्ट्रॅटेजिक अलायन्सेस विभाग आणि इतर अधिकारी यांची त्यांनी भेट घेतली.
S.Bedekar/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1903401)
Visitor Counter : 233