भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हवामान अंदाज क्षेत्रात भारत आणि ब्रिटन यांच्यात सहकार्याला मोठा वाव - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग

Posted On: 27 FEB 2023 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2023

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, हवामान अंदाज क्षेत्रात भारत आणि ब्रिटन (युनायटेड किंगडम) यांच्यात सहकार्याला मोठा वाव आहे.

आज नवी दिल्ली येथे चौथ्या हवामान आणि हवामान बदल करिता सेवा भागीदारी इंडिया (WCSSP-india) या वार्षिक विज्ञान कार्यशाळा – 2023 चे उद्घाटन करताना ते म्हणाले की, आमच्यातील परस्पर संबंधांची पातळी उच्च असल्याने ब्रिटन सोबत काम करणे सोपे आहे.

"दोन्ही समाजांना समान परिस्थितींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे आम्हाला हवामान अंदाजासह इतर समस्यांकडे समान दृष्टीकोनातून पहावे लागते," असेही त्यांनी सांगितले.

ही कार्यशाळा 7 फेब्रुवारी 2019 रोजी स्वाक्षरी झालेल्या “वेदर अँड क्लायमेट सायन्स फॉर सर्व्हिस पार्टनरशिप इंडिया अर्थात हवामान आणि हवामान बदल करिता सेवा भागीदारी इंडिया(WCSSP-india)” या प्रकल्पाशी संबंधित अंमलबजावणी कराराचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली आहे.  यावेळी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान (MoES) आणि ब्रिटनच्या वेधशाळा मंत्रालयादरम्यान 28 जानेवारी 2019 रोजीच्या हवामान आणि हवामान बदल विज्ञानातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराचे पालन करण्यात आले. 

या कार्यशाळेत ब्रिटनचे जवळजवळ 25 शास्त्रज्ञ आणि जवळजवळ 70 भारतीय शास्त्रज्ञ/संशोधक प्रत्यक्ष सहभागी होतील. त्याचबरोबर 50 हून अधिक तज्ञ ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी होतील. या कार्यशाळेत मांडण्यात येणारे विचार आणि होणारी चर्चा ही हवामान आणि हवामान अंदाज क्षमता सुधारण्यासाठी, विशेषत: भारतीय क्षेत्रावरील उच्च प्रभाव असलेल्या हवामानासंबंधी होणाऱ्या सहकार्याच्या प्रयत्नांना नवीन कल्पना आणि दिशा देतील अशी अपेक्षा आहे.

भारत-ब्रिटन यांच्यातल्या सहकार्यातून होणाऱ्या डब्ल्यूसीपीएसएस इंडिया(WCPSS-india) प्रकल्पाच्या प्रमुख विज्ञान उद्दिष्टांमध्ये दक्षिण आशियाई मान्सून प्रणालीतील नैसर्गिक धोक्यांवर संशोधन आणि नैसर्गिक धोक्यांचा पूर्वसूचना वेळेच्या श्रेणीनुसार जोखमीवर आधारित उपकरणे आणि तंत्रे सुधारणे यांचा समावेश आहे.

 

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902906) Visitor Counter : 138


Read this release in: English , Urdu , Hindi