संरक्षण मंत्रालय
यूकेमध्ये वॅडिन्ग्टन येथे होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी
Posted On:
26 FEB 2023 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2023
युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होमाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी आज हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून रवाना झाली. 6 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 दरम्यान हा युद्धसराव होणार आहे.
कोब्रा वॉरियर हा बहुस्तरीय हवाई युद्धसराव असून यामध्ये फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील रॉयल एयर फोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत सहभागी होणार आहेत.
भारतीय हवाई दल यावेळी या युद्धसरावात पाच मिराज-2000 ही लढाऊ विमाने, दोन सी-17 ग्लोबमास्टर III आणि IL-78 हे हवेत इंधन भरणारे एक विमान यांच्यासह सहभागी होणार आहे. हवाई युद्धामधील विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये सहभागी होणे आणि विविध हवाई दलांच्या सर्वोत्तम पद्धती शिकणे हा या युद्धसरावाचा उद्देश आहे.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902589)
Visitor Counter : 275