वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत 523.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मूल्याच्या कांद्याची निर्यात करण्यात आली


भारतातून कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंध नाहीत

Posted On: 26 FEB 2023 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 फेब्रुवारी 2023

 

एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत 523.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीच्या कांद्याची निर्यात करण्यात आली.

सरकारने कांद्याच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध किंवा बंदी घातलेली नाही. कांद्याचे सध्याचे निर्यात धोरण ‘मुक्त’ आहे. केवळ कांदा बियाणांची निर्यात 'प्रतिबंधित' आहे. विदेशी व्यापार महासंचालकांच्या  अधिकृत परवानगीनुसार हा प्रतिबंध घालण्यात आला आहे.

विदेशी व्यापार महासंचालकांच्या द्वारे अधिसूचना क्रमांक 50 दि. 28.12.2020 नुसार सुधारित कांद्याचे (सर्व जातींचे) कापलेले, भाग केलेले किंवा पावडर स्वरूपात, तसेच बंगलोर गुलाब कांदे आणि कृष्णपुरम कांदे वगळून पावडर स्वरूपात, कापलेले, चिरलेले किंवा पावडर स्वरुपातील कांदे 'प्रतिबंधीत'' श्रेणीतून  'मुक्त' श्रेणीत समाविष्ट केले आहेत.

2022 या वर्षासाठी महिना-निहाय निर्यात आकडेवारी

Month wise (2022)

Value wise (in USD Million)

% increase in exports from 2021 to 2022

Apr

48.0

13.74

May

31.9

13.20

Jun

36.0

-25.19

Jul

50.1

19.74

Aug

49.0

-5.21

Sep

50.7

7.56

Oct

40.8

17.33

Nov

45.9

71.39

Dec

52.1

49.76

Total

523.8

16.3

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902561) Visitor Counter : 244


Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi , Telugu