संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज चौथा वर्धापनदिन; सीआयएससी आणि इतर वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन युद्धवीरांना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
25 FEB 2023 6:02PM by PIB Mumbai
राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज म्हणजे 25 फेब्रुवारी 2023 रोजी चौथा वर्धापन दिन आहे. या दिवसानिमित्त आज एकात्मिक संरक्षण कर्मचारी पथकाचे अध्यक्ष, स्टाफ समितीचे प्रमुख (CISC), एअर मार्शल बी.आर कृष्णा, यांच्यासह, डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ, लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिन्द्र कुमार, नौदल स्टाफचे कार्यवाहक उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल किरण देशमुख आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी युद्धस्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद वीरांना आदरांजली वाहिली.
हे युद्धस्मारक,स्वातंत्र्यापासून देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून उभारण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 फेब्रुवारी 2019 रोजी या स्मारकाचे राष्ट्रार्पण केले होते. देशातील शूर जवानांच्या शौर्यगाथा अधिकाधिक लोकांपर्यंत, विशेषतः युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
डिजिटल आदरांजली:
या युद्धस्मारकाच्या परिसरात संवादात्मक स्क्रीन लावण्यात आल्या असून, त्या माध्यमातून, लोक शहीद जवानांना श्रद्धांजली वाहू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी सहली
देशाची प्रादेशिक एकात्मता सुरक्षित ठेवण्यात लष्करी दलांचे महत्त्व लोकांना कळावे, आणि त्यातून युवकांना देशबांधणीची प्रेरणा मिळावी, यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय युद्धस्मारकात सहली आयोजित केल्या जातात.
श्रद्धांजली कार्यक्रम
या युद्धस्मारकात एक अखंड प्रज्वलित ज्योत असून,त्याद्वारे जवानांनी देशरक्षणासाठी केलेल्या बलिदानाला श्रद्धांजली वाहिली जाते, ही अखंड ज्योत इथे प्रज्वलित केल्यानंतर सर्व राष्ट्रीय उत्सवांसह, प्रत्येक कार्यक्रमाला इथे जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते.
राष्ट्रबांधणीसाठीचे कार्यक्रम
ह्या युद्धस्मारकात राष्ट्रीय एकात्मतेसाठीच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे ‘कारगिल: एक शौर्य गाथा’ हा स्टेज शो आणि ललित कला अकादमीतर्फे ‘शौर्य गाथा’ या थीमवर चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
7SW9.JPG)
EBQ4.JPG)
***
S.Kane/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902357)