वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ट्रायफ्रेडच्या ट्राईब्स इंडिया स्टोअरच्या उत्पादनांना वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट (ओडीओपी) आणि भौगोलिक निर्देशांक (जीआय) टॅग
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2023 5:18PM by PIB Mumbai
जिल्हा पातळीवर समावेशक सामाजिक आर्थिक विकासाला चालना देत शाश्वत रोजगार निर्माण करणे हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभाग आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक विशिष्ट उत्पादन निवडून त्याचे ब्रॅण्डिंग करून त्याला प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना आहे. हा दृष्टिकोन साकारण्यासाठी आता ‘ओडीओपी’ ला आता ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघाकडून आयोजित सध्या सुरू असलेल्या आदी महोत्सवात ट्राईब्स इंडिया स्टोअरमधील आदिवासी उत्पादनांचे ओडीओपी मॅपिंग करून त्यावर एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) हा टॅग लावला जात आहे. नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर 16 ते 27 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवादरम्यान हा टॅग असलेल्या ट्रायफेड उत्पादनांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डी पी आय आय टी च्या संचालक सुप्रिया देवस्थळी यांनी विशेष मार्गदर्शन केले आणि देशभरातील विविध भागातल्या उत्पादनांचे कौतुक केले. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाच्या कक्षेत ही उत्पादने आणून या आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ट्रायफेड सोबत केलेली भागीदारी म्हणजे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे देशभरातील शंभर पेक्षा जास्त इंडिया स्टोअर वोकल फोर लोकल आणि मेक फॉर द वर्ल्ड या चळवळीमध्ये सहभागी होतील, ट्रायफ्रेडच्या ट्राईब इंडिया रिटेल स्टोअर मध्ये देशाच्या सर्व भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण, आदिवासी उत्पादनांचा संग्रह उपलब्ध आहे. हा दृष्टीकोन आणखी व्यापक करण्यासाठी कारागीर आणि विणकर समूहांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी ओडीओपी अंतर्गत ओव्हरलॅपिंग असलेली अशाच प्रकारची इतर दुकाने आणि एम्पोरियम्सना यामध्ये सहभागी करून त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी जास्त मोठा मंच उपलब्ध करून देण्याची आणि त्यांना पुढे आणण्याची योजना आहे.


***
S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1902341)
आगंतुक पटल : 240