राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गयानाच्या उपराष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 24 FEB 2023 4:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023

गयानाचे उपराष्ट्रपती डॉ. भरत जगदेव यांनी आज (24 फेब्रुवारी, 2023) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.भारत गयानासोबतच्या संबंधांना खूप महत्त्व देतो. गेल्या 180 वर्षांपासून गयाना हे भारतीय बंधू-भगिनींची मातृभूमी आहे, असे  डॉ जगदेव यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना राष्ट्रपतींनी सांगितले. जरी भारत आणि गयानामध्ये  भौगोलिकदृष्ट्या मोठे अंतर असले तरीही  वसाहतवादी भूतकाळ, प्रामुख्याने कृषी आणि ग्रामीण आधारित अर्थव्यवस्था आणि बहुसांस्कृतिक समाज यांसारखे उभय देशांमध्ये अनेक सामाईक पैलू  आहेत, असे त्यांनी सांगितले.

भारत आणि गयाना यांच्यातील व्यापार वाढत  आहे. 2021-22 मध्ये, महामारी असूनही द्विपक्षीय व्यापारात 300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असे सांगत राष्ट्रपतींनी  द्विपक्षीय व्यापारात आणखी वैविध्य आणण्याच्या गरजेवर भर दिला.
 
विकास भागीदारी हा भारत-गयाना  संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ आहे. आपल्या  भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (आयटीईसी) कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत गयानातील 640 हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गयानाच्या उपराष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यामुळे भारत आणि गयाना यांच्यातील मैत्रीचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला.


S.Kane/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1902049) अभ्यागत कक्ष : 215