रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे सुरक्षा दल आणि युआयसी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या 18 व्या जागतिक सुरक्षा परिषदेत 'जयपूर घोषणापत्राचा' स्वीकार

प्रविष्टि तिथि: 23 FEB 2023 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023

रेल्वे सुरक्षा दल (RPF)आणि आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना- युआयसी यांनी  संयुक्तपणे आयोजित केलेल्या 18 व्या युआयसी जागतिक सुरक्षा परिषदेची आज सांगता झाली आहे. यावेळी उपस्थित सर्वांनी एकमतांनं ‘जयपूर घोषणापत्रा’चा स्वीकार केला. या परिषदेत, तज्ञ, रेल्वेसुरक्षेशी संबंधित सर्व भागधारक आणि जगभरातील प्रतिनिधी एकत्र आले होते. रेल्वे सुरक्षा धोरण: प्रतिसाद आणि भविष्यासाठीचा आराखडा या संकल्पनेवर आधारित रेल्वे सुरक्षेशी संबंधित, ताज्या घडामोडी आणि सर्वोत्तम पद्धती यावर या परिषदेत चर्चा झाली.

परिषदेच्या शेवटच्या दिवशी, पंतप्रधानांचे सुरक्षा उपसल्लागार पंकज कुमार सिंह यांचे भाषण झाले. भविष्यात येऊ शकणाऱ्या सुरक्षाविषयक धोक्यावर मात करण्यासाठी, समाधान शोधण्यासाठी  या क्षेत्रातील सर्व भागधारकांना एका मंचावर आणण्याच्या युआयसी आणि त्यांच्या सुरक्षा मंचाच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. भारतातील प्रवाशांच्या सुरक्षितेत वाढ करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांचे, जसे की मुलांची सुखरूप सुटका करणारे‘ऑपरेशन नन्हे फ़रिश्ते’, मानवी तस्करीतून महिला आणि मुलांची सुटका करणारे ऑपरेशन राहत, अशा उपक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. तसेच, रेल्वे सुरक्षेविषयी सर्वसमावेशक समाधान शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता, 5-जी, माहिती तंत्रज्ञान अशा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असेही ते म्हणाले. या तंत्रज्ञानाच्या द्वारे, रेल्वे व्यवस्थेतील सर्व पैलू, पायाभूत सुविधा, कार्यान्वयन आणि प्रवाशांचा अनुभव अशा सगळ्याचा विचार करता येईल, असे ते म्हणाले.

आरपीएफचे महासंचालक आणि युआयसी सुरक्षा प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष संजय चंदर यांनी यावेळी 'जयपूर घोषणापत्र" वाचून दाखवले. यात युआयसीसाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन शोधण्यासाठी कृतीक्षम अजेंडयाची रूपरेषा सांगितली, जी जागतिक रेल्वे संघटनांना सुरक्षितता आणि सुरक्षिततेचे त्यांचे दीर्घकालीन ध्येय साध्य करण्यात मदत करू शकते.

परिषदेच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात "युआयसी सुरक्षा विभागाशी संबंधित घडामोडींची अद्ययावत माहिती" या सत्राने झाली. या चर्चासत्रात, कार्यगटांविषयी सादरीकरण, सुरक्षा केंद्रावरील कार्यशाळा आणि सुरक्षा मंचाच्या पुढील टप्प्यांचा समावेश होता.

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1901741) आगंतुक पटल : 287
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu