कंपनी व्यवहार मंत्रालय
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अतिरिक्त शुल्क न भरता काही अर्ज भरण्यासाठी 31.03.2023 पर्यंत दिली मुदतवाढ
Posted On:
22 FEB 2023 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
एमसीए 21 पोर्टलचे आवृत्ती 2 मधून आवृत्ती 3.0 मध्ये रुपांतर केल्यामुळे आणि आवृत्ती-3 मध्ये अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीत झालेला बदल, या पार्श्वभूमीवर भागधारकांनी केलेल्या विनंतीची दखल घेत, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) सामान्य परिपत्रक 05/2023 द्वारे एक निर्णय घेतला असून, त्या अंतर्गत भागधारकांसाठी 23 जानेवारी 2023 रोजी जारी केलेले 45 अर्ज भरण्याची मुदत कोणत्याही अतिरिक्त शुल्का शिवाय 31.03.2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
दिनांक 09.01.2023 चे सामान्य परिपत्रक क्रमांक 1/2023 आणि दिनांक 07.02.2023 चे परिपत्रक क्रमांक 03/2023 च्या नंतरचा हा निर्णय आहे.
त्यापुढे, फॉर्म PAS-03 (भाग भांडवलाच्या वाटपाच्या उद्देशाने) जो 20.01.2023 रोजी आवृत्ती-2 मध्ये दाखल करण्यासाठी बंद करण्यात आला होता आणि 23.01.2023 रोजी आवृत्ती-3 मध्ये सुरु करण्यात आला होता आणि ज्याची दाखल करण्याची अंतिम तारीख 20.01.2023 आणि 28.02.2023 च्या दरम्यान येते, असे अर्ज कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 31.03.2023 पर्यंत दाखल करता येतील.
याव्यतिरिक्त, CA 2013 च्या कलम 4 च्या उप-कलम (5) अंतर्गत राखीव असलेल्या नावांसाठी आरक्षणाचा कालावधी आणखी 20 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. 23.01.2023 ते 28.02.2023 या कालावधीत दाखल करण्याचे अर्ज पुन्हा दाखल करण्याची मुदत, कंपनी (नियोजन) नियम, 2014 च्या नियम 9 अंतर्गत 15 दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
हे बदल दिनांक 21.02.2023 रोजी जारी करण्यात आलेल्या एमसीए सामान्य परिपत्रक क्रमांक 04/2023 द्वारे लागू करण्यात आले आहेत. या मुदत वाढीमुळे, भागधारकांना एमसीए 21 आवृत्ती 3.0 पोर्टलचा भाग म्हणून सुरु करण्यात आलेल्या नवीन फायलिंग प्रणालीमध्ये सहजतेने स्थलांतर करता येईल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1901575)
Visitor Counter : 201