शिक्षण मंत्रालय
परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये राज्य सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठीच्या चळवळीला संस्थात्मक स्वरूप देऊन 'लोक चळवळ ' बनवण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाद्वारे (एनबीटी ) प्रकाशित 'एक्झाम वॉरियर्स ' हे पुस्तक सर्व शालेय ग्रंथालयांमध्ये उपलब्ध करून देणार
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2023 9:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचे (पीपीसी 2023) 6 वे पर्व 27 जानेवारी 2023 रोजी संवादात्मक स्वरूपात आयोजित करण्यात आले होते, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश-विदेशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. राज्य सरकारी शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांचा प्रचंड सहभाग हे या वर्षीच्या परिक्षा पे चर्चा 2023 चे वैशिष्ट्य ठरले. राज्य सरकारी शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांचा सहभाग एकूण 38.8 लाखांपैकी 2022 मधील सुमारे 2 लाखांवरून 16.5 लाखांवर पोहोचला आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील विशेष आमंत्रित विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रजासत्ताक दिन संचलन , बीटिंग द रिट्रीट सोहळा इत्यादींसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याची आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळाली.
माननीय पंतप्रधानांचा हा कार्यक्रम, परीक्षेच्या काळात तणावपूर्ण वातावरणाचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी शिक्षक आणि पालकांना सुसज्ज करतानाच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी साहाय्य करण्यावर भर देतो. या संदर्भात पंतप्रधानांनी 'एक्झाम वॉरियर्स’ नावाचे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी परीक्षेच्या तणावावर मात करण्याचे मार्ग आणि माध्यमाबद्दल अनोखे कृतीशील ‘मंत्र’ समाविष्ट आहेत.पुस्तकाचा देशभरातील विद्यार्थ्यांवर होणारा लक्षणीय प्रभाव लक्षात घेता,शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाने (एनबीटी ), ,11 भारतीय भाषांमध्ये म्हणजे असामिया, बंगाली , गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि ऊर्दूमध्ये एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित केला आहे.
परीक्षा पे चर्चाचे लोक चळवळीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने, जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना पंतप्रधानांच्या ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा लाभ घेता यावा यासाठी ,समग्र शिक्षा अंतर्गत 'एक्झाम वॉरियर्स पुस्तके प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना केली आहे.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1901573)
आगंतुक पटल : 273