कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालय 27 फेब्रुवारीपासून व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव सुरू करणार
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2023 8:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023
कोळसा मंत्रालयाने 03 नोव्हेंबर 2022 रोजी व्यावसायिक कोळसा खाणींच्या लिलावाची 6 वी फेरी आणि 5 व्या फेरीचा दुसरा टप्पा सुरू केला, याला उद्योग क्षेत्राकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि 36 कोळसा खाणींसाठी 96 निविदा प्राप्त झाल्या, यात प्रथमच बोली लावणाऱ्यांचाही सहभाग होता, हे बोलीदारांमधील उत्साह आणि कोळसा खाण क्षेत्राविषयी सकारात्मक भावना प्रतिबिंबित करते.
तांत्रिक मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर, एकापेक्षा जास्त बोली प्राप्त झालेल्या 27 कोळसा खाणी सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 पासून पुढच्या लिलावासाठी ठेवल्या जातील. बोलीदारांना लिलाव प्रक्रियेशी परिचित करण्यासाठी, मॉक ई-लिलाव शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित केला जाईल. बोलीदारांना लिलाव प्रक्रियेशी परिचित करण्यासाठी, शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रत्यक्ष ई-लिलावासारखा, लिलाव सराव आयोजित केला जाईल.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1901553)
आगंतुक पटल : 247