आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
ऑकलंड आणि मुंबई कर्करोग उपचारांसाठी सहकार्य करणार
वायपापा तौमाता राऊ, ऑकलंड विद्यापीठ आणि टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबई, यांनी कर्करोगाच्या उपचारामध्ये दीर्घकालीन सहकार्यासाठी आणि डिजिटल आरोग्याचा वापर करून कर्करोगाच्या उपचाराचे वाढीव मार्ग शोधण्यासाठीच्या सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी
Posted On:
22 FEB 2023 5:00PM by PIB Mumbai
मुंबई , 22 फेब्रुवारी 2023
वायपापा तौमाता राऊ, ऑकलंड विद्यापीठ तसेच भारतातील मुंबई येथील टाटा मेमोरियल रुग्णालया (TMH),या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रसिद्ध कर्करोग उपचार रुग्णालय आणि संशोधन केंद्र असलेल्या संस्थांनी कर्करोगावर दीर्घकालीन सहकार्यासाठी सामंजस्य करार (MOU) वर स्वाक्षरी केली आहे.
संशोधन विद्यापीठाचे उप-कुलगुरू प्रोफेसर फ्रँक ब्लूमफिल्ड आपल्या शैक्षणिक विभागाच्या शिष्टमंडळासह, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे तसेच प्राध्यापक आणि वैद्यकीय कर्करोग तज्ञ डॉ. वनिता नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या प्रतिनिधींना भेटले. डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान वापरून कर्करोगाच्या उपचारासाठी नवे मार्ग शोधण्यासाठी सहकार्य हा या भेटीचा उद्देश होता.
भागीदारीसाठी परिकल्पित केलेल्या प्रारंभिक प्रकल्पांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे: रुग्ण, संशोधक आणि नियामक यांच्यासाठी अभ्यास-संबंधित क्रियाकलापांचा मागोवा घेण्यारा क्लिनिकल चाचण्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म; बाह्यरुग्ण विभाग अधिक कार्यक्षम करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रिस्क्रिप्शननुसारच्या औषधांची सुरक्षितता वाढविण्यासाठी एक डिजिटल पद्धत, जसे की औषधांमधील संभाव्य गंभीर परस्पर क्रिया ओळखून उपचार करणार्या डॉक्टरांना सूचित केले जाईल याची खात्री करण्यासाठी संपर्क सुविधा विकसित करणे.
कर्करोगाच्या उपचारासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दक्ष असलेल्या दलामध्ये सामील होऊन ऑकलंड विद्यापीठासोबतची भागीदारी जाहीर करताना टाटा मेमोरियल रुग्णालयाला अतिशय आनंद होत आहे असे टाटा मेमोरियल सेंटरचे प्रमुख डॉ. बडवे याप्रसंगी म्हणाले.
“आम्ही आमच्या कर्करोगाच्या रुग्णांचे जीवन सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्हाला आशा आहे की ऑकलंड विद्यापीठाच्या सहकार्यामुळे रूग्णांचे जीवन सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाची ताकद वापरण्यात आम्हाला मदत होईल, असेही डॉ. बडवे म्हणाले. ऑकलंड विद्यापीठाच्या तांत्रिक कौशल्यासह कर्करोगपीडित रुग्णांची काळजी घेण्यात आमचे कौशल्य एकत्र करून, कर्करोगपीडित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात खरा बदल घडवून आणू अशी आम्हाला खात्री आहे," असेही ते म्हणाले.
एओटेरोआ, न्यूझीलंड आणि भारतीय समाजांमधील समानता लक्षात घेऊन संस्था कर्करोगाच्या काळजीच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात एकत्र येणार असल्याचे प्राध्यापक ब्लूमफिल्ड यांनी सांगितले.
“दोन्ही देशांचा आरोग्यसेवेतील सहकार्याचा मोठा इतिहास आहे आणि ही भागीदारी पूर्वीपासूनच मजबूत संबंधांवर आधारित आहे. ऑकलंड विद्यापीठ टाटा मेमोरियल रुग्णालयासारख्या अग्रगण्य संस्थेच्या भागीदारीत जागतिक आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कटिबद्ध आहेत”, असेही ते म्हणाले.
कॅन्सर रिसर्च स्टॅटिस्टिक्स अँड ट्रीटमेंटच्या मुख्य संपादक डॉ. वनिता नोरोन्हा यांनी कर्करोगाची प्रगत काळजी घेण्यात टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या ताकदीवर भाष्य केले.
“टाटा मेमोरियल रुग्णालय आणि ऑकलंड विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार म्हणजे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहयोग तसेच ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची एक रोमांचक संधी असल्याचे डॉ. वनिता नोरोन्हा म्हणाल्या. या कर्करोग विरोधी लढाऊ तुकडीत सामील होऊन या संस्था तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे संशोधन पुढे नेण्यासाठी, रुग्णांचे आयुष्य सुधारण्यासाठी आणि कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी सामूहिकपणे अद्वितीय कौशल्य आणि संसाधनाद्वारे सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"या भागीदारीमध्ये रुग्ण आणि आरोग्यसेवा व्यावसायिक दोघांनाही महत्त्वपूर्ण फायदे मिळण्याची क्षमता आहे," असे त्या म्हणाल्या.
भारताच्या दीर्घ भेटीचा भाग म्हणून ऑकलंड विद्यापीठ मुंबईला भेट देत होते ज्यात ‘इंडियाज ग्लोबल व्हिजन: बिल्डिंग युनिव्हर्सिटी फॉर नॉलेज इकॉनॉमी’ या विषयावर भर देणाऱ्या क्वाक्वेरेली सायमंड्स (क्यूएस) इंडिया या तीन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेच्या भविष्याची आणि त्या भविष्यातील बिल्डिंग ब्लॉक्सची कल्पना मांडणारी ही एक अत्यंत फलदायी शिखर परिषद होती, असे मत शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे कुलगुरू प्राध्यापक डॉन फ्रेशवॉटर यांनी व्यक्त केले.
“आपण जागतिक आव्हानांना तोंड देत आहोत आणि या आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी उच्च शिक्षण महत्त्वाची भूमिका आणि जबाबदारी निभावते. आपल्यासाठी ती आव्हाने नि:पक्षपातीपणा आणि टिकाऊपणावर केंद्रित आहेत. एक उच्च शिक्षित समुदाय म्हणून, आपण या आव्हानांवर चर्चा करण्यापलीकडे जाऊन उपाय शोधले पाहिजेत आणि नंतर त्यावर कृती देखील केली पाहिजे. हीच क्रियाशील ज्ञान अर्थव्यवस्था आहे. ” असे डॉन फ्रेशवॉटर यावेळी म्हणाले.
वायपापा तौमाता राऊ, ऑकलंड विद्यापीठ हे एक सर्वोच्च जागतिक विद्यापीठ आहे तसेच ते न्यूझीलंडमधील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. विद्यापीठातील संशोधकांनी रुग्णालय ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञान वापरून ऑप्टिमायझेशन आणि क्लिनिकल चाचण्यांच्या ऑटोमेशनमध्ये महत्त्वपूर्ण कौशल्य प्राप्त केलेले आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901438)
Visitor Counter : 225