अर्थ मंत्रालय

पहिली G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नरची बैठक आणि दुसरी G20 वित्त आणि मध्यवर्ती बँक डेप्युटीजची बैठक या बैठकांच्या कार्यक्रमाला उद्यापासून बंगळूरू इथे सुरुवात होणार

Posted On: 21 FEB 2023 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023

 

भारताच्या G20 अध्यक्षतेखाली पहिली G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर (एफएमसीबीजी) कर्नाटकमध्ये बंगळूरू इथे, 24- 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीपूर्वी G20 वित्त आणि मध्यवर्ती बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरची बैठक(एफसीबीडी) 22 फेब्रुवारी 2023 रोजी होईल.

अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव, अजय सेठ आणि अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ अनंथा व्ही. नागेश्वरन यांनी आज नवी दिल्ली इथे माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर, डॉ. शक्तिकांत दास, संयुक्तपणे एफएमसीबीजी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. तर एफसीबीडी बैठकीच्या सह-अध्यक्ष पदावर अजय सेठ आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर, डॉ. मायकेल डी. पात्रा, हे असतील.

भारत सरकारचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग ठाकूर, उद्या G20 एफसीबीडी बैठकीचे उद्घाटन करतील.

भारताच्या अध्यक्षतेखाली 24-25 फेब्रुवारी रोजी होणार्‍या G20 एफएमसीबीजी यांच्या बैठकीला, G20 सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर, आमंत्रित सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख उपस्थित राहतील. या बैठकीला एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित राहतील.

भारताच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे उद्दिष्ट अशा रीतीने तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे काही महत्त्वाच्या जागतिक आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यावहारिक आणि अर्थपूर्ण दृष्टीकोनांवर सदस्य देशांचे मंत्री आणि गव्हर्नर यांच्यात विचारांची अर्थपूर्ण देवाणघेवाण होऊ शकते.

ही बैठक 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी तीन सत्रांमध्ये होणार असून, यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. एकविसाव्या शतकातील सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय विकास बँकांना बळकट करणे, लवचिक, समावेशक आणि शाश्वत 'उद्याच्या शहरांसाठी' वित्तपुरवठा, आर्थिक समावेशन आणि उत्पादकता वाढीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा (DPI) चा लाभ घेणे, या आणि अन्य मुद्द्यांचा यात समावेश असेल. या सत्रांमध्ये जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक आरोग्य आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणीशी संबंधित समस्यांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश असेल. 

G20 एफएमसीबीजी बैठकीतील चर्चा, G20 फायनान्स ट्रॅक 2023 च्या विविध कार्यप्रवाहांसाठी स्पष्ट निर्देश प्रदान करण्याच्या उद्देशाने असेल.

या बैठकींच्या पार्श्वभूमीवर, या ठिकाणी भेट देणारे मंत्री, गव्हर्नर, प्रतिनिधी आणि इतर प्रतिनिधींसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, क्रिप्टो मालमत्तेवरील धोरणात्मक दृष्टीकोन आणि सीमा पार राष्ट्रीय पेमेंट सिस्टमची भूमिका यासारख्या विषयांवर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अर्थ मंत्री, मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर्स आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळासाठी रात्रीच्या मेजवानीदरम्यान संवाद आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातील, ज्यामधून भारतातील विविध खाद्य प्रकार आणि आणि संस्कृती प्रदर्शित होईल.

वॉक द टॉक: पॉलिसी इन अॅक्शन' या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मंत्री आणि गव्हर्नर्स भारतीय विज्ञान संस्थेला (IIS) भेट देतील, आणि इथल्या टेक-इनोव्हेटर्स (तंत्रज्ञान नावोन्मेशी) आणि उद्योजकांबरोबर संवाद साधतील, जे G20 सदस्य देशांसमोरील काही आव्हानांवरील किफायतशीर आणि खात्रीदायक उपायांवर काम करत आहेत.

मंत्री, राज्यपाल, डेप्युटीज आणि प्रतिनिधींचे स्वागत करत सेठ म्हणाले की, विविध प्रकारच्या कला आणि हस्तकलेसह खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि कलात्मक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विश्वाचे प्रदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या सादरीकरणामधून, कर्नाटकचे सांस्कृतिक आचरण आणि वारशाची कलात्मकता आणि वैभव दिसून येईल.

26 फेब्रुवारी रोजी, कर्नाटकमधील सुंदर निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रतिनिधींना सहलीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सचिवांनी दिली.

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901206) Visitor Counter : 296


Read this release in: English , Urdu , Hindi