संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या बीवाय 524, मालवण या दुसर्या आणि बीवाय 525, मंगरूळ, या तिसऱ्या जहाज बांधणी प्रकल्पाचा, 21 फेब्रुवारी 23 रोजी मेसर्स सीएसएल, कोची इथे शुभारंभ
Posted On:
21 FEB 2023 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2023
पाणबुडी विरोधी युद्धासाठीची भारतीय नौदलाची दुसरी युद्ध नौका (BY 524, मालवण) आणि तिसरी युद्धनौका (BY 525, मंगरूळ), या शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) (सीसएल) जहाज बांधणी प्रकल्पाचा शुभारंभ, 21 फेब्रुवारी 23 रोजी, मेसर्स सीएसएल कोची इथे रिअर एडमिरल संदीप मेहता, एसीडब्ल्यूपी&ए आणि रिअर एडमिरल आयबी उथैया, डीजी डब्ल्यूडीबी, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मधु एस नायर, सीएमडी, सीएसएल, यांच्यासह भारतीय नौदलाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि सीएसएल उपस्थित होते.
स्वदेशी निर्मात्यांकडून मिळवलेली सर्व प्रमुख आणि सहाय्यक उपकरणे/प्रणाली असलेली ही जहाजे, संरक्षण मंत्रालयाच्या “मेक इन इंडिया” उपक्रमाचा ध्वज अभिमानाने मिरवणार आहेत.
भारत सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमाच्या अनुषंगाने आठ एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजांच्या बांधकामाचा करार मेसर्स सीएसएल, कोची यांच्याबरोबर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जहाजे 25 वर्षे सेवा देण्याच्या दृष्टीने बांधली जात आहेत. ही जहाजे पाण्याखालील धोके शोधण्यासाठी आणि हल्ले निष्फळ ठरवण्यासाठी किनारपट्टी भागात उप-पृष्ठीय पाळत ठेवतील.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1901203)
Visitor Counter : 135