वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मध्य आणि पश्चिम विभागांसाठीच्या पीएम गतिशक्ती प्रादेशिक कार्यशाळेसाठीची माहिती देणारी कर्टन रेझर पत्रकार परिषद आज गोव्यात संपन्न
पीएम गतिशक्ती हा एकात्मिक नियोजन आणि समन्वयीत अंमलबजावणी शक्य करण्यासाठी परिवर्तनशील दृष्टिकोन देणारा एक मंच असून, यातून बहुपर्यायी तसेच शेवटच्या टोकापर्यंत संपर्कव्यवस्था पोहचवणे शक्य: विशेष सचिव,डीपीआयआयटी
Posted On:
19 FEB 2023 7:54PM by PIB Mumbai
मध्य आणि पश्चिम विभागासाठीच्या पहिल्या पीएम गतिशक्ती कार्यशाळेची माहिती देणारी कर्टन रेझर पत्रकार परिषद आज गोव्यात पणजी इथे झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या विशेष सचिव, सुमिता डवरा यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.
ह्या प्रादेशिक कार्यशाळेचा उद्देश राज्ये आणि केंद्रीय मंत्रालये/ विभाग यांच्यात समन्वय स्थापन करण्याच्या दृष्टीने, विविध हितसंबंधियांमध्ये एकत्रित काम करण्याची समन्वय ऊर्जा निर्माण करणे हा आहे.
यावेळी बोलतांना, सुमिता डवरा म्हणाल्या की पीएम गतिशक्ती योजना हा परिवर्तनशील दृष्टिकोन असलेला एक मंच असून, त्याद्वारे बहुपर्यायी संपर्क व्यवस्था शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे एकात्मिक नियोजन आणि समन्वयित अंमलबजावणी करणे शक्य होऊ शकेल. ह्या कार्यशाळेमागची कल्पना, सर्व राज्यांना एकत्र आणून त्यांनी परस्परांकडून शिकावे, राष्ट्रीय पातळीवरच्या कार्याचे प्रात्यक्षिक दाखवणे तसेच इतर अनेक राज्यांत सुरू असलेल्या कामांची माहिती सादर करणे, ज्यात ही राज्ये पायाभूत सुविधांची उभारणी कशी करत आहेत, याचा समावेश असतो, असेही त्या म्हणाल्या. या कार्यशाळेचा उद्देश, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सुरू असलेल्या पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी सुधारणे हा असून, त्यांना पीएम गतिशक्तीच्या दृष्टिकोनातून पूर्ण करणे तसेच, लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढवून, लॉजिस्टिक खर्च कमी करणे, हा आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
या कार्यशाळेत, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, दूरसंचार विभाग आणि नीती आयोग यासारखी केंद्रीय मंत्रालये/विभाग आणि गुजरात, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मधील 100 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. कार्यशाळेत केंद्रीय मंत्रालये आणि राज्य विभागांनी नियोजन, राज्य लॉजिस्टिक धोरणे, युनिफाइड लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्म (ULIP), लॉजिस्टिक इझ अॅक्रॉस डिफरंट स्टेट्स (LEADS), सिटी लॉजिस्टिक्स, आणि प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुप (एलईडीएस) आणि प्रकल्प देखरेख गट यंत्रणा अशा सर्व विषयांवर चर्चा होईल.
या कार्यशाळेविषयीची संक्षिप्त पार्श्वभूमी इथे बघता येईल.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1900636)
Visitor Counter : 175