ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दीदींच्या (महिलांच्या) नवोन्मेषी कल्पनांना आणि उत्पादनांना अर्थसहाय्य पुरवून त्यांना आर्थिक दृष्ट्‍या सक्षम करण्यासाठी ग्राम विकास मंत्रालय महिला स्वयंसहाय्यता गट बँक स्थापन करण्याचा विचार करत असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 18 FEB 2023 10:42PM by PIB Mumbai

 

दीदींच्या (महिलांच्या) नवोन्मेषी कल्पनांना आणि उत्पादनांना अर्थसहाय्य पुरवून त्यांना आर्थिक दृष्ट्‍या सक्षम करण्यासाठी आपण महिला स्वयंसहाय्यता गट (एसएचजी) बँक तयार स्थापन करण्याच्या संकल्पनेवर विचार करत आहोत, असे केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायती राज मंत्री, गिरीराज सिंह यांनी आज सांगितले.

उत्तरप्रदेशमध्ये नोएडा इथे नवीन वर्षातील पहिल्या सरस आजिविका मेळा-2023 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना, गिरीराज सिंह म्हणाले की, देशात 9 कोटी पेक्षा जास्त महिला, म्हणजेच, देशातील 9 कोटी कुटुंबे स्वयंसहाय्यता गटाचे सदस्य आहेत. यापैकी प्रत्येक दीदीने (महिलेने) दर महा 100 रुपयांची बचत केली, तर बहुतांश दीदींच्या (महिला एसएचजी  सदस्य) जास्तीतजास्त ठेवीच्या आश्चर्यकारक रकमेसह बँक यशस्वी ठरेल.

गिरीराज सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या वोकल फॉर लोकलमंत्राचा पूर्ण क्षमतेने प्रयोग करण्याची वेळ आली आहे, आणि त्यांनी मेळ्यामध्ये उपस्थित सर्वांना आणि देशाच्या सर्व नागरिकांना महिला कारागीरांकडून उत्पादनांची खरेदी करण्याचे आणि खाद्य पदार्थांच्या स्टाॅल (विक्री केंद्रे)वर स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांनी बनवलेल्या स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले.

देशाच्या 27 राज्यांमधील स्वयंसहाय्यता गटाच्या 350 पेक्षा जास्त महिला सदस्यांनी प्रदर्शनांत आपले स्टाॅल उभारले आहेत. त्याशिवाय, 100 पेक्षा जास्त सखींच्या (महिला) सहभागासह इंडिया फूड कोर्ट मध्ये, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांची 23 दुकाने आहेत.

गिरीराज सिंह म्हणाले की, ग्राम विकास मंत्रालय नवीन महिला सदस्यांची (सखींची) नोंदणी करण्याचे काम सक्रियतेने करत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2024 पर्यंत 10 कोटी स्वयंसहाय्यता गट सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900441) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Tamil