खाण मंत्रालय
भारतातील खनिज उत्पादनात डिसेंबर 2022 मध्ये 10% वाढ
महत्त्वाची दहा खनिजे उत्पादनात सकारात्मक वाढ दर्शवतात
एप्रिल- डिसेंबर 2022-23 दरम्यान एकूण वाढ 5.4% नोंदवली गेली
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2023 9:50AM by PIB Mumbai
डिसेंबर - 2022 (आधार: 2011-12=100) महिन्यासाठी खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक 107.4 वर पोहोचला जो इंडियन ब्युरो ऑफ माइन्स (IBM) च्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2021 मधील पातळीच्या तुलनेत 9.8% जास्त आहे. त्याच वेळी, एप्रिल - डिसेंबर, 2022-23 या कालावधीसाठी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत एकत्रित वाढ 5.4% इतकी आहे.
डिसेंबर 2022 मध्ये महत्त्वाच्या खनिजांची उत्पादन पातळी पुढील प्रमाणे होती: कोळसा 833 लाख टन, लिग्नाइट 35 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2888 दशलक्ष घन. मी., पेट्रोलियम (क्रूड) 25 लाख टन, बॉक्साइट 2272 हजार टन, क्रोमाईट 340 हजार टन, तांबे कॉन्क. 10 हजार टन, सोने 174 किलो, लोह खनिज 251 लाख टन, शिसे कॉन्क. 30 हजार टन, मॅंगनीज खनिज 307 हजार टन, झिंक कॉन्क. 137 हजार टन, चुनखडी 355 लाख टन, फॉस्फोराईट 170 हजार टन, मॅग्नेसाइट 9 हजार टन आणि हिरे 43 कॅरेट.
डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये सकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांमध्ये यांचा समावेश आहे: सोने (64.2%), फॉस्फोराइट (53.9%), लोह खनिज (19.5%), चुनखडी (14.5), मॅंगनीज धातू (12.8%), कोळसा (11.4%), झिंक कॉन्क (9.4%), शिसे कॉन्क (4.5%), तांबे कॉन्क (3.9%), आणि नैसर्गिक वायू (2.6%). नकारात्मक वाढ दर्शविणाऱ्या इतर महत्त्वाच्या खनिजांमध्ये यांचा समावेश आहे: पेट्रोलियम (-1.2%), बॉक्साइट (-9%), लिग्नाइट (-10.7), क्रोमाइट (-11.5%), मॅग्नेसाइट (-22.5%) आणि हिरे (-38.6%).
***
Shilpa P/S. Mukhedkar/CYadav
http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/Twitter-iconI0HR.jpg
(रिलीज़ आईडी: 1900326)
आगंतुक पटल : 252