वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कतारने भारतातून गोठवलेल्या सीफूडच्या आयातीवरील बंदी उठवली

Posted On: 17 FEB 2023 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी  2023

कतारने भारतातून गोठवलेल्या सीफूडच्या आयातीवर घातलेली तात्पुरती बंदी उठवली आहे. यामुळे निर्यात वाढीचा मार्ग मोकळा झाला असून पश्चिम आशियाई देशासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारले आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, फिफा विश्वचषकापूर्वी भारतातून पाठवण्यात आलेल्या काही मालात व्हिब्रिओ कॉलरा विषाणू आढळून आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली होती. फुटबॉल स्पर्धेच्या धावपळीत त्यांच्या देशात पुरेशा चाचणी प्रयोगशाळांच्या अभावामुळे ही तात्पुरती बंदी घातली असल्याचे कतारी अधिकाऱ्यांनी भारताला कळवले होते.

कतारमधील भारतीय दूतावासासह भारत सरकारचा वाणिज्य विभाग या समस्येचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. कतारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाबरोबर चर्चेच्या अनेक फेऱ्या नंतर 16 फेब्रुवारी रोजी भारतातून गोठवलेल्या सीफूड आयातीवरील बंदी उठवण्यात आली. तथापि, गारठवलेल्या सीफूडच्या निर्यातीवर निर्बंध कायम आहेत.

 

 

 

S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1900288) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Hindi