गृह मंत्रालय

बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, 1967 (युएपीए) अंतर्गत संघटना /व्यक्ती ‘दहशतवादी संघटना /‘दहशतवादी’ म्हणून घोषित


राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्रालयाने आणखी एक व्यक्ती आणि दोन संस्थांना 'दहशतवादी'/'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले

Posted On: 17 FEB 2023 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी  2023

भारताचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण पुढे नेत, केंद्र सरकारने ऑगस्ट, 2019 मध्ये बेकायदेशीर कृत्ये  (प्रतिबंध) कायद्यात (युएपीए) सुधारणा करून एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित करण्याची तरतूद समाविष्ट केली. या दुरुस्तीपूर्वी केवळ संघटनांनाच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले जाऊ शकत होते.

या सुधारित तरतुदीची अंमलबजावणी करून केंद्र सरकारने 53 जणांना दहशतवादी घोषित केले होते.

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालयाने आज आणखी एक व्यक्ती आणि दोन संघटनांना 'दहशतवादी'/ 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केले.

आज आणखी एक व्यक्ती - हरविंदर सिंग संधू @ Rinda दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आला. तो बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे आणि सध्या तो पाकिस्तानच्या लाहोरमध्ये सीमावर्ती एजन्सींच्या संरक्षणाखाली आहे आणि विशेषत: पंजाबमध्ये विविध दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे. या घोषणेसह, यूएपीएच्या चौथ्या अनुसूचित आता 54 जणांची दहशतवादी म्हणून नोंद आहे.

केंद्र सरकारने आज युएपीएच्या तरतुदीनुसार खालील दोन संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.

  1. खलिस्तान टायगर फोर्स (KTF) - ही एक अतिरेकी संघटना आहे आणि पंजाबमध्ये पुन्हा दहशतवाद उफाळून आणणे आणि भारताच्या प्रादेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांना आव्हान देणे आणि पंजाबमध्ये लक्ष्यित हत्यांसह विविध दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे हे तिचे उद्दिष्ट आहे.
  2. जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स (जेकेजीएफ) - हे दल घुसखोरीचे प्रयत्न, अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी हल्ले करण्यात सहभागी असल्याचे आढळून आले आहे. ते लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, तहरीक-उल-मुजाहिदीन, हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी इत्यादी विविध दहशतवादी संघटनांमधून आपल्या सदस्यांची भर्ती करते.

या दोन संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर, आता कायद्याच्या पहिल्या अनुसूची अंतर्गत एकूण 44 संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1900272) Visitor Counter : 459