आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातल्या 10 कोटींपेक्षा जास्त रुग्णांना टेलिमेडिसिन सेवा पुरवणारे “ईसंजीवनी” व्यासपीठ हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री, डॉ मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन


ई-संजीवनीच्या लाभार्थ्यांपैकी 57% पेक्षा जास्त महिला असून सुमारे 12% लाभार्थी ज्येष्ठ नागरिक असल्याची डॉ मनसुख मांडवीय यांची माहिती

दिवसाला 5 लाख रुग्णांना टेली-उपचार सल्ला सुविधा देण्यात आल्या

पुढील दोन आठवड्यांच्या काळात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ई-संजीवनी 2.0 सुरु केले जाणार

Posted On: 16 FEB 2023 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी  2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे, “ईसंजीवनी ही देशाच्या आरोग्य क्षेत्रातील एक क्रांती असून, भारताने आपल्या ई-आरोग्य सेवेच्या  प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. भारत सरकारच्या ई-संजीवनी या राष्ट्रीय टेलिमेडिसीन व्यासपीठाने 10 कोटी लाभार्थ्यांना टेली-उपचार सल्ला (टेलि-कन्सल्टेशन) सेवा पुरवून आणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.”

टेलि-कन्सल्टेशनच्या डिजिटल व्यासपीठाद्वारे पुरवल्या जाणार्‍या आरोग्य सेवांची प्रशंसा करताना डॉ मांडविया यांनी नमूद केले की, 100.11 दशलक्ष रूग्णांना 15,731 केंद्रांवर 115,234 आरोग्य आणि निरामयता  केंद्रांवर  सेवा देण्यात आली, आणि 1,152 ऑनलाइन ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) मधील  वैद्यकीय तज्ज्ञ  आणि सुपर-स्पेशालिस्टना टेलीमेडिसिनचे प्रशिक्षण देण्यात आले. दिवसाला 1 दशलक्ष पेक्षा जास्त रुग्णांना उपचार सल्ला सेवा देण्यासाठी ई-संजीवनी व्यासपीठाचा आणखी विस्तार करण्यात आला असून, आतापर्यंत त्याने केवळ एका दिवसात 5,10,702 रुग्णांना सेवा देण्याचा उच्चांक नोंदवला आहे.   

आपल्या ट्वीटर संदेशात केंद्रीय मंत्री आज म्हणाले- “देशातील नागरिकांना घर बसल्या तज्ञ डॉक्टरचा सल्ला उपलब्ध करून, देशाने आज 10 कोटी ‘ई-संजीवनी टेली-कंसल्टेशन' चे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. PM@NarendraModi जी यांच्या नेतृत्वाखाली देश डिजिटल आरोग्य परिसंस्थेत दिवसेंदिवस बळकट होत आहे”.

ई-संजीवनी- भारताची राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा ही प्राथमिक आरोग्य सेवेत लागू करण्यात आलेली जगातील सर्वात मोठी टेलिमेडिसिन सेवा आहे. ई-संजीवनी हे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी एक वरदान ठरले आहे, ज्या ठिकाणी आरोग्य सेवा सहज उपलब्ध नसते. म्हणूनच या सेवेची आरोग्य परिप्रेक्ष्यात व्यापक प्रशंसा झाली असून, त्याने आपल्या देशाच्या प्राथमिक आरोग्य सेवेचा कायापालट केला आहे. त्यामुळे असे म्हणणे उचित ठरेल, की आयसीटीद्वारे, ई-संजीवनीने आरोग्यसेवेचे लोकशाहीकरण केले आहे. ई-संजीवनीच्या लाभार्थ्यांपैकी 57% पेक्षा जास्त महिला आहेत आणि सुमारे 12% लाभार्थी ज्येष्ठ नागरिक आहेत, ही गोष्ट आश्वासक आहे.   

आंध्र प्रदेश (31701735), तामिळनाडू (12374281), पश्चिम बंगाल (12311019), कर्नाटक (11293228), उत्तर प्रदेश (5498907), महाराष्ट्र (4780259), तेलंगणा (4591028), मध्य प्रदेश (4015879), बिहार (3220415) आणि गुजरात (2988201), ही दहा राजे ई-संजीवनीचा स्वीकार आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये देशात आघाडीवर आहेत:

टेलि-कन्सल्टेशनच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग केल्यावर, ई-संजीवनीच्या नव्या स्वरुपात टेली-रोगनिदानाला पुढील तार्किक आयाम जोडण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालय सज्ज आहे. ई-संजीवनी 2.0 हे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, यामधील नवीन वैशिष्ट्यांसह टेलिमेडिसिनचा अनुभव आणखी वृद्धिंगत करेल.

Table (eSanjeevani Consultations – States & UTs breakup)

eSanjeevani Consultations

Sl. No.

16.02.2023

TOTAL
 (HWC & OPD)

eSanjeevani AB_HWC

eSanjeevani OPD

 

 

INDIA

10,01,17,675

9,04,18,022

96,99,653

 

1

ANDHRA PRADESH

31701735

31668610

33125

 

2

TAMIL NADU

12374281

10627311

1746970

 

3

WEST BENGAL

12311019

12300222

10797

 

4

KARNATAKA

11293228

8171744

3121484

 

5

UTTAR PRADESH

5498907

3719931

1778976

 

6

MAHARASHTRA

4780259

4582456

197803

 

7

TELANGANA

4591028

4572269

18759

 

8

MADHYA PRADESH

4015879

4009244

6635

 

9

BIHAR

3220415

3154283

66132

 

10

GUJARAT

2988201

2030465

957736

 

11

ASSAM

1066556

1036412

30144

 

12

CHHATTISGARH

934758

933651

1107

 

13

UTTARAKHAND

910672

163045

747627

 

14

ODISHA

710516

710139

377

 

15

RAJASTHAN

682518

579341

103177

 

16

KERALA

654574

178141

476433

 

17

JHARKHAND

644597

631929

12668

 

18

JAMMU & KASHMIR

382588

239305

143283

 

19

PUNJAB

360455

356204

4251

 

20

HARYANA

359580

189717

169863

 

21

HIMACHAL PRADESH

286097

280910

5187

 

22

MEGHALAYA

75538

75524

14

 

23

DNH & DD

74162

74099

63

 

24

CHANDIGARH

47131

33922

13209

 

25

MANIPUR

44024

35311

8713

 

26

DELHI

43669

0

43669

 

27

LADAKH

24428

24350

78

 

28

SIKKIM

16876

16861

15

 

29

TRIPURA

16252

16097

155

 

30

MIZORAM

4615

4424

191

 

31

PUDUCHERRY

932

888

44

 

32

ARUNACHAL PRADESH

825

260

565

 

33

LAKSHADWEEP

532

532

0

 

34

GOA

387

70

317

 

35

ANDAMAN AND NICOBAR ISLANDS

249

176

73

 

36

NAGALAND

192

179

13

 

 


S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1899929) Visitor Counter : 225


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil