सांस्कृतिक मंत्रालय
मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित राष्ट्रीय संस्कृती महोत्सव वृद्धींगत करत आहे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ही भावना
हा महोत्सव मुंबईकरांना एकत्र येण्याची आणि भारताच्या सर्वोत्तम सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घेण्याची संधी देतो
Posted On:
16 FEB 2023 3:06PM by PIB Mumbai
मुंबई, 16 फेब्रुवारी 2023
मेघालयातील चिंग जंग ये संगमा, जम्मू-काश्मीरमधील निशू पंडित आणि ओडिशातील सरिता शेत्रिया यांच्यात काय साम्य आहे? हे सर्व भारताच्या विविध भागातून आलेले लोककलाकार असून मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत.
राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2023 चे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी झाले. मुंबईत चर्चगेट येथील आझाद मैदानात 11 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री, सुधीर मुनगंटीवार आणि महाराष्ट्राचे पर्यटन, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता, महिला आणि बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील आणि केंद्रीय सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी हे महोत्सवात पहिल्या काही दिवसांमध्ये सन्माननीय अतिथी महणून उपस्थित होते.
उद्घाटन सोहळा
आंगन या प्रदर्शन स्थळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील
केंद्रीय सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री, मीनाक्षी लेखी लोक कलाकारांसह मंचावर
या महोत्सवात संपूर्ण भारतातील जवळजवळ 350 लोककलाकार आणि आदिवासी कलाकार, जवळजवळ 300 स्थानिक लोक कलाकार, काही ट्रान्स जेंडर कलाकार आणि दिव्यांग कलाकार,ख्यातनाम शास्त्रीय कलाप्रकारांचे सादरकर्ते, यांच्यासह प्रसिद्ध कलाकार आपल्या चित्ताकर्षक सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतील आणि त्यांना प्रेरणा देतील
सांस्कृतिक मंत्रालयाच्या सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांचे प्रतिनिधित्व करणारे लोक कलाकार
नाट्यशाळा, मुंबईच्या दिव्यांग कलाकारांचे सादरीकरण - 'उडान' हे एक मूकनाट्य
या महोत्सवात संबलपुरी नृत्य सादर करण्यासाठी सरिता क्षेत्रीय, व्रुजालिनी बिसोई आणि त्यांचे पथक ओडिशातून आले आहे. “या प्रतिष्ठित व्यासपीठावर आमची नृत्यकला सादर करायला आम्हाला अभिमान वाटतो आहे ”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मेघालयातील चिंग जंग ये संगमा, राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाच्या मंचावर वंगाळा नृत्य सादर करणार आहेत. . “मला येथे येऊन आणि भारताच्या विविध भागांमधून आलेल्या इतर कलाकारांसमवेत एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेला अनुसरून कलाविष्कार सदर करायला खूप आनंद होत आहे!”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जम्मू येथील निशू पंडिताचा ताफा डोगरी लोकनृत्य सादर करत आहे. “या नृत्यातून आम्ही आमच्या भागातील पारंपरिक विवाह सोहळ्याची झलक सदर करू, मला आशा आहे की मुंबईतले प्रेक्षक आमचे मनोबल उंचावतील. ” असे आपल्या सादरीकारणाबद्दल माहिती देताना तिने सांगितले. भारतभरातील इतर लोककलाकारांसोबत मिसळण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याने निशूला खूप आनंद झाला आहे.
या कलाकारांव्यातिरिक्त, भारतातील सर्व राज्यांमधून आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रांमधून सुमारे 150 कारागीरांना, ‘आंगन’ अंतर्गत त्यांच्या कला आणि हस्तकला प्रकारांची विक्री- आणि-प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले असून, यासाठी सुमारे 70 स्टॉल उपलब्ध केले आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्य हातमाग विभाग आणि स्टार्टअप्ससाठी 25 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.
हातमाग आणि हस्तकला स्टॉल्स
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांचे चित्र प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. नवी दिल्लीच्या आयजीएनसीएने ‘पंढरपूर वारी’वर प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांचे चित्र प्रदर्शन
केंद्रीय संचार ब्युरो (सीबीसी) या ठिकाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावर प्रदर्शनही आयोजित करत आहे.
सीबीसीद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रदर्शन
कार्यक्रमाच्या ठिकाणी मैदानावर खाद्यकट्टा (फूड कोर्ट) उभारला असून, या 37 स्टॉल्सना भेट देणाऱ्यांसाठी भारतभरातील खाद्यपदार्थांचे प्रकार, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच भरड धान्याचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
महोत्सव स्थळी खाद्यकट्टा
महोत्सवातील प्रत्येक संध्याकाळ अभ्यागतांसाठी एक मेजवानी आहे. शास्त्रीय, लोककला, समकालीन कला प्रकार आणि त्याही पल्याडचे सादरीकरण करणाऱ्या देशभरातील नामवंत कलाकारांच्या सादरीकरणाने ती सजलेली असते.
लोककलाकारांच्या रोज सादर होणाऱ्या "कलर्स ऑफ इंडिया" या नृत्य कार्यक्रमाचे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रशांत गोगोई यांनी केले आहे.
शास्त्रीय सादरीकरणामध्ये रिदम्स ऑफ मणीपूर ,तेजस्विनी साठे, नागालँडचे लिपोकमार झुदीर, कलाक्षेत्रातील शीजिथ कृष्णा, गणेश चंदनशिवे, आनंद भाटे, नृत्यगुरु शमा भाटे आणि मैत्रेयी पहारी हे कलाविष्कार सादर करणार आहेत.
मोहित चौहान, शमित त्यागी, सिद्धार्थ एंटरटेनर्स – राज आणि किशोर सोढा, अन्नू कपूर, डॉ. सलील कुलकर्णी, अविनाश चंद्रचूड, उस्ताद मामे खान, राहुल देशपांडे आणि नितीन मुकेश हे प्रख्यात कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.
"कलर्स ऑफ इंडिया" सादरीकरण
नागालँड कंझर्व्हेटरी ऑफ म्युझिक कॉयर द्वारे आयोजित लिपोकमार त्झुदिर
तेजस्विनी साठे आणि संचाचे कथ्थक सादरीकरण
कलाक्षेत्र फाउंडेशनतर्फे भरतनाट्यम सादरीकरण
मोहित चौहानचा ‘तुमसे ही, २५ साल का सुरिला सफर’
आनंद भाटे यांचे मराठी अभंगांचे सादरीकरण
सलील कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे "माझे जगणे होते गाणे”
दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल.
सकाळी 11:00 ते रात्री 10:00 हस्तकला आणि कला प्रदर्शन.
दुपारी 02:30 ते 03:30 स्थानिक कलाकारांचे मार्शल आर्टचे सादरीकरण
दुपारी 04:00 ते 05:30 स्थानिक कलाकारांचे सादरीकरण
संध्याकाळी 06:00 ते 06:45 पारंपरिक, आदिवासी आणि लोकनृत्य नृत्य सादरीकरणासह
संध्याकाळी 07:00 ते रात्री 08:15 प्रसिद्ध शास्त्रीय कलाकारांचे कार्यक्रम.
रात्री 08:30 ते रात्री 10:00 प्रसिद्ध तारेतारकांचे कार्यक्रम.
दैनंदिन घडामोडींचे तपशील खाली पाहता येतील -
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय दरवर्षी भारतातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे आयोजन करते. 2019 मध्ये मध्य प्रदेशात, 2022 मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणि आता महाराष्ट्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व सात विभागीय सांस्कृतिक केंद्रे आणि अकादमी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे.
संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व नागरिक आणि कलाप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
तर मग तुम्ही वाट कसली पाहताय? राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि देशाच्या कलात्मक वारशला मानवंदना देण्यासाठी कटीबद्ध आहे. लोकांनी एकत्र यावे आणि भारताच्या सर्वोत्तम सांस्कृतिक परंपरांचा अनुभव घ्यावा यासाठी ही एक उत्तम संधी आहे. त्याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही आहात का?
S.Patil/Bhakti/Vinayak/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899808)
Visitor Counter : 257