दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर, "टपाल सेवा- जागतिक सामाजिक-आर्थिक विकास आणि संपर्काचे एक साधन", या संकल्पनेवर टपाल विभागाने आयोजित केली गोलमेज परिषद
Posted On:
15 FEB 2023 8:56PM by PIB Mumbai
भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या अनुषंगाने, दूरसंवाद मंत्रालया अंतर्गत टपाल विभागाने एक गोलमेज परिषद आणि "टपाल सेवा- जागतिक सामाजिक-आर्थिक विकास आणि संपर्काचे एक साधन", या संकल्पनेवर एक चर्चासत्र आयोजित केले होते. हायब्रीड माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्राला युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू), एशियन पॅसिफिक पोस्टल युनियन (एपीपीयू), टपाल विभाग, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए), G20 सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणारे टपाल ऑपरेटर आणि मंत्रालये, आमंत्रित देश आणि APPU चे सदस्य आणि टपाल क्षेत्रातील इतर भागधारक यांनी उपस्थिती नोंदवली. हा कार्यक्रम, भारताचे राष्ट्रीय फिलाटेलिक प्रदर्शन: ‘AMRITPEX 2023’ चा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला. विविध देशांचा इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्व यांना पोस्टाच्या तिकिटांच्या माध्यमातून एकत्रित प्रदर्शित करण्यासाठी एक विशेष G20 प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.
भारत सरकारचे सचिव आणि टपाल सेवा मंडळाचे अध्यक्ष, विनीत पांडे यांनी उद्घाटनपर भाषण केले. भारताच्या G20 अध्यक्षपदाची संकल्पना, त्याचे UPU मिशन आणि G20 उद्दिष्टांची दिशा, यावर त्यांनी विचार मांडले.
चर्चासत्रातील पॅनेलच्या सदस्यांनी गोलमेज आणि पॅनेल चर्चेच्या मुख्य संकल्पने अंतर्गत विविध क्षेत्रे आणि उप-संकल्पनांवरील आपली मते, अनुभव आणि भविष्यातील दृष्टिकोन याचे आदान-प्रदान केले.
जगाशी जोडण्याचा एक संवेदनशील आणि प्रभावी मार्ग म्हणजे टपाल सेवा: टपाल तिकीट, प्रशिक्षण आणि क्षमता विकास.
MEA चे विशेष सचिव (G20 ऑपरेशन्स), मुक्तेश के. परदेशी म्हणाले की, पोस्टाची तिकिटे जमवून त्यांची माहिती गोळा करण्याचा छंद (फिलेटली) हा केवळ लोक, इतिहास, संस्कृती आणि विविध देशांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी महत्वाचा नसून, यामध्ये मैत्रीचे मजबूत बंध निर्माण करण्याची प्रचंड क्षमता आहे. इतर पॅनेलमधील सदस्य, टपाल फिजीचे सीईओ, डॉ. अनिरुद्ध बनसोड, यांनी पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचार्यांची नियुक्ती करून, टपाल क्षेत्र बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर, आणि संस्थात्मक सहकार्य, टाय-अप, निधी समर्थन आणि जगभरातील टपाल ऑपरेटरसाठी सतत बदलत असलेल्या तांत्रिक-ऑपरेशनल परिस्थितीमधील क्षमता विकासाची गरज, भर दिला. मेरी अँडरसन यांनी, विविध नियामक आणि ऑपरेशनल सुधारणांद्वारे USPS मध्ये होत असलेले परिवर्तन यावर विचार मांडले. डॉ. राजीव आणि जीन-पॉल यांनी टपाल क्षेत्रासाठीची आगामी आव्हाने आणि सुप्त संधी, तसेच हे क्षेत्र जगभरात व्यापार आणि वाणिज्य विकासामध्ये कशी मदत करत आहे, यावर लक्ष केंद्रित केले.
टपाल विभागाचे डिजिटलायझेशन: नागरिकांचे सक्षमीकरण
डॉ.व्ही.पी. सिंग यांनी टपाल सेवांच्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि डिजिटलायझेशन हा, विशेषतः शेवटच्या टोकाची व्यक्ती आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) यांच्यासाठी विकास, पोहोच आणि संपर्क आणि सर्वव्यापी पोस्टल सेवांचा कणा कसा बनला आहे यावर चर्चा केली.
आर्थिक समावेशामध्ये टपाल क्षेत्राची भूमिका:
नागरिकांना आर्थिक सेवा प्रदान करण्यात टपाल कार्यालय बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर ओसवाल्ड यांनी विचार मांडले. बँकिंग, विमा, मनी ट्रान्सफर, आणि सरकारी पेमेंट घरोघरी पोहोचवणे, आर्थिक साक्षरता आणि त्रास-मुक्त व्यवहारांसाठी नवीन फिनटेकशी जुळवून घेणे यासारख्या टपाल वित्तीय सेवा, सर्वसमावेशक समाज आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशस्त करत आहेत.
20 अधिपेक्षा जास्त देश आणि 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सहभागींच्या उपस्थितीने गोलमेज आणि पॅनेल चर्चा रंगली. ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली, जपान या देशांचे प्रतिनिधी आणि इतर भागधारकांनीही या चर्चेत योगदान दिले. G20 निमंत्रित देशांच्या सहभागींनी हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल आणि G20 क्षेत्रात टपाल क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल टपाल विभागाचे अभिनंदन केले.
जगभरात सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी टपाल क्षेत्र कशी महत्वाची भूमिका बजावत आहे, आणि हे क्षेत्र नागरिकांना घरपोच सेवा पुरवण्यासाठी ‘वन स्टॉप सोल्युशन’ (एकमेव उपाय) म्हणून कसे उदयाला येऊ शकते, यावर सचिव (पोस्ट) यांनी मांडलेल्या विचारांनी या चर्चासत्राचा समारोप झाला.
***
ShaileshP/RajashriA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1899715)
Visitor Counter : 129