कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर


2022-23 मध्ये 3235.54 लाख टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज

तांदूळ, गहू, मका, हरभरा, मूग, रेपसीड आणि मोहरी आणि उसाचे विक्रमी उत्पादन होणार

शेतकरी आणि वैज्ञानिकांचे परिश्रम आणि सरकारच्या ठोस धोरणांमुळे हे यश मिळाल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे प्रतिपादन

Posted On: 14 FEB 2023 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 14 फेब्रुवारी  2023

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी वर्ष 2022-23 साठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचे दुसरे आगाऊ अंदाज जाहीर केले आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, चालू कृषी वर्षात 3235.54 लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे परिश्रम, शास्त्रज्ञांचे प्राविण्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शेतकरी हिताची धोरणे, यामुळे कृषी क्षेत्राचा दिवसेंदिवस विकास होत आहे.

आगाऊ अंदाजानुसार, भरड धान्यांच्या उत्पादनात झालेल्या वाढीची प्रशंसा करून, तोमर यांनी आशा व्यक्त केली की येत्या काही वर्षांमध्ये भरड धान्य/पौष्टिक धान्यांचे उत्पादन आणि वापरात आणखी वाढ होईल.

संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे, या गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच, भरड धान्य/ पौष्टिक धान्यांना 'श्री अन्न' हे नाव दिले आहे.

वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनाचे मूल्यमापन हे राज्यांकडून मिळालेल्या अभिप्रायावर आधारित असते आणि इतर स्रोतांकडून उपलब्ध झालेल्या माहितीसह त्याला प्रमाणित केले जाते. राज्यांकडून तसेच पर्यायी स्रोत आणि इतर घटकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारावर या मूल्यांकनाची पुढील पुनरावृत्ती केली जाते.

दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2022-23 साठी प्रमुख पिकांचे अंदाजे उत्पादन खालीलप्रमाणे आहे:

  • अन्नधान्य – 3235.54 लाख टन (विक्रमी)
  • तांदूळ - 1308.37 लाख टन (विक्रमी)
  • गहू - 1121.82 लाख टन (विक्रमी)
  • पोषक / भरड तृणधान्ये - 527.26 लाख टन
  • मका – 346.13 लाख टन (विक्रमी)
  • बार्ली - 22.04 लाख टन (विक्रमी)
  • एकूण कडधान्ये - 278.10 लाख टन. (विक्रमी)
  • हरभरा - 136.32 लाख टन. (विक्रमी)
  • मूग - 35.45 लाख टन. (विक्रमी)
  • तेलबिया - 400.01 लाख टन. (विक्रमी)
  • भुईमूग - 100.56 लाख टन.
  • सोयाबीन - 139.75 लाख टन.
  • रेपसीड आणि मोहरी - 128.18 लाख टन. (विक्रमी)
  • कापूस - 337.23 लाख गाठी (प्रत्येकी 170 किलो)
  • ऊस – 4687.89 लाख टन (विक्रमी)
  • ज्यूट आणि मेस्ता – 100.49 लाख गाठी (प्रत्येकी 180 किलो)

 2022-23 च्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशात एकूण अन्नधान्याचे 3235.54 लाख टन इतके विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज असून, तो मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 79.38 एलएमटी ने जास्त आहे. वर्ष 2022-23 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन 1308.37 लाख टन होईल असा अंदाज (नोंदीकृत)आहे. गेल्या वर्षीच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन 13.65 लाख टनांनी अधिक आहे.

या वर्षी गव्हाचे एकूण उत्पादन 1121.82 लाख टन होईल, असा अंदाज (नोंदीकृत) असून हे प्रमाण गेल्या वर्षीच्या गहू उत्पादनापेक्षा 44.40 लाख टन जास्त आहे.

वर्ष 2022-23 मध्ये 346.13 लाख टन मक्याचे उत्पादन होईल असा अंदाज (नोंदीकृत) आहे. गेल्या वर्षी 337.30 लाख टन मक्याचे उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यावर्षी 8.83 लाख टन अधिक मका उत्पादित होईल असा अंदाज आहे.

पोषक/ भरड धान्यांचे उत्पादन 527.26 लाख टन होईल असा अंदाज आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा  16.25 लाख टनांनी जास्त आहे.

यावर्षी अंदाजे 35.45 लाख टन मुगाचे उत्पादन होईल. गेल्या वर्षीच्या मूग उत्पादनापेक्षा यावर्षी 3.80 लाख टन अधिक मूग उत्पादन होणार आहे.

वर्ष 2022-23 मध्ये अंदाजे 278.10 लाख टन डाळींचे उत्पादन होईल जे गेल्या वर्षातील 273.02 लाख टन डाळींच्या उत्पादनापेक्षा 5.08 लाख टनांनी अधिक आहे आणि गेल्या पाच वर्षातील सरासरी डाळ उत्पादनापेक्षा 31.54 लाख टन अधिक आहे.

वर्ष 2022-23  मध्ये सोयाबीन आणि रेपसीड तसेच मोहरी यांचे एकूण उत्पादन अनुक्रमे 139.75  आणि 128.18  लाख टन होईल असा अंदाज असून हे 2021-22 या गेल्या वर्षातील उत्पादनापेक्षा अनुक्रमे 9.89 लाख टन आणि 8.55 लाख टनांनी जास्त आहे..

वर्ष 2022-23 मध्ये देशात एकूण तेलबियांचे 400.01 लाख  टन विक्रमी  उत्पादन होईल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी झालेल्या तेलबियांच्या उत्पादनापेक्षा हे 20.38 लाख टन अधिक उत्पादन हाती आले आहे.

देशात वर्ष 2021-23 मध्ये 4687.89 लाख टन उसाचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2022-23 या वर्षात 293.65 लाख टन ऊस जास्त पिकेल, असा अंदाज आहे.

देशामध्ये यावर्षी  337.23 लाख गासड्या (प्रत्येकी170 किलो)कापूस आणि ताग तसेच मेस्ता यांचे  100.49 लाख गासड्या (प्रत्येकी 180 किलो) उत्पादन होईल असा अंदाज आहे.

विविध पिकांच्या उत्पादनाचा अंदाज हा वर्ष 2022-23 मधील दुसऱ्या अग्रिम अंदाजानुसार वर्तवला आहे. 2012-13 या वर्षापासून पुढील काळातील तुलनात्मक अंदाज सोबत जोडण्यात आले आहेत.

अधिक तपशीलासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

 
S.Patil/Rajashree/Sanjana/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1899236) Visitor Counter : 387