संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूर्वरंग  - एअरो इंडिया

Posted On: 11 FEB 2023 4:29PM by PIB Mumbai

 

बंगळुरू येथील येलहंका हवाई दल तळावर  13-17 फेब्रुवारी 23 या कालावधीत एअरो इंडिया 2023 चा द्वैवार्षिक  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संरक्षण क्षेत्र उद्योगांना त्यांची अद्ययावत उपकरणे, हेलिकॉप्टर आणि विमाने प्रदर्शित करण्यासाठी  व्यासपीठ उपलब्ध करून देईल.   संरक्षण दलातील कर्मचार्‍यांना मूळ उपकरणे उत्पादक (ओईएम) प्रतिनिधींशी संवाद साधण्याची आणि भविष्यात सशस्त्र दलात  समाविष्ट करण्यासाठी  विचाराधीन  उत्पादनांचा प्रत्यक्ष  अनुभव घेण्याची  संधी देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

आत्मनिर्भरतासाध्य करण्याच्या देशाच्या  उद्दिष्टाच्या अनुषंगाने, भारतीय नौदलाने अलीकडेच , हलके लढाऊ विमान (नौदल ) ,स्वदेशी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक विमान (ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर) स्वदेशी विमानवाहू युद्धनौका  आयएनएस  विक्रांतवर उतरवले आहे.या  विमानाचे उड्डाण  भारतीय नौदलाच्या चाचणीसाठी नियुक्त  वैमानिकाने केले होते. ही विशिष्ट क्षमता भारतीय नौदलाच्या आत्मनिर्भर भारताच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचे फलित  आहे.

एअरो इंडिया 2023 दरम्यान, भारतीय नौदल अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे.या  कार्यक्रमा दरम्यान एएलएच  एमके  III आणि एमआर  विमान पी8आय ही  स्वदेशी विमाने,अनुक्रमे हवाई कसरती  आणि स्टॅटिक डिस्प्लेमध्ये सहभागी होतील. भारतीय नौदलाने संरक्षण उत्पादन विभागाच्या सहकार्याने 'हवाई शस्त्रास्त्र  देखभालीमध्ये  आत्मनिर्भरता या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. ही चर्चासत्र सरकारच्या उपक्रमांवर आणि सशस्त्र दलातील क्षेपणास्त्रांच्या देखभालीसाठी आणि पुढील वाटचालीवर तपशीलवार चर्चा करण्याच्या अनुषंगाने, संरक्षण मंत्रालय , वापरकर्ते , देखभाल करणारे गुणवत्ता हमी संस्था  , संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतीय उद्योगातील प्रमुख भागधारकांना व्यासपीठ प्रदान करतील.

शिक्षण  आणि उद्योगांसोबत निरंतर प्रतिबद्धता  हे भारतीय नौदलाच्या   आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या प्रयत्नांचे केंद्रस्थान आहे.या दिशेने विविध शैक्षणिक संस्था आणि प्रमुख उद्योग भागीदार यांच्यात माहिती आणि संसाधने सामायिक करण्यासाठी  सामंजस्य करार केले जातात.एरो इंडिया 2023 दरम्यान, दोन प्रमुख भागीदार म्हणजेच इस्रो  आणि मेसर्स  एव्ही ऑईल  यांच्यात 'बंधन' या कार्यक्रमाचा भाग म्हणून सामंजस्य कराराच्या माध्यमातून जोडले जात आहे. 

वर्षानुवर्षे व्याप्ती आणि भव्यता  वाढल्याने, नौदल हवाई विभागाचा विकास  आणि सक्षमीकरण तसेच राष्ट्राच्या संरक्षण दलांच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने एअरो इंडिया आणखी एक  महत्वपूर्ण एक पाऊल ठरेल.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898392) Visitor Counter : 272


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil