आयुष मंत्रालय
तथ्याधारित संशोधनाला चालना देऊन पारंपारिक औषध पद्धती बळकट करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे - सर्बानंद सोनोवाल
आयुष मंत्र्यांच्या हस्ते युनानी औषधांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
Posted On:
11 FEB 2023 4:03PM by PIB Mumbai
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पारंपारिक औषधांच्या क्षेत्रात भारताने जगात घेतलेल्या आघाडीचा पुनरुच्चार केला आणि आयुष क्षेत्रात तथ्याधारित वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याच्या गरजेवर भर दिला. युनानी दिवस 2023 आणि नवी दिल्ली विज्ञान भवन इथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या औपचारिक उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. युनानी औषध पद्धतीला मोठा जनाधार मिळत असून वर्ष 2014 पासून त्यात आणखी वाढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या परिषदेला संबोधित करताना केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “युनानी औषध प्रणाली ही भारताची समृद्ध पारंपारिक औषध प्रणाली आहे. कोविड-19 महामारी दरम्यान आयुष आधारित उपायांनी आराम कसा मिळतो हे आपण अनुभवले आहे.
आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई म्हणाले की, युनानी औषध पद्धती आरोग्य राखण्यासाठी आणि रोग टाळण्यासाठी निरोगी आहाराच्या सवयींसाठी तपशीलवार मार्गदर्शन प्रदान करते.
यावेळी सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन (सीसीआरयूएम)चे विविध अहवाल, आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिका, ऑनलाइन जर्नलचे प्रकाशन करण्यात आले. सीसीआरयूएम ने विकसित केलेल्या युनानी औषध पद्धतीमधील सर्वसामान्य उपचारावरील मोबाइल ॲपचे देखील आज लोकार्पण करण्यात आले.
सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन देखील हायब्रीड पद्धतीने युनानी मेडिसिनवर आधारित दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करत आहे. या परिषदेत सुमारे 1300 प्रतिनिधी, तज्ञ व्यक्ती, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898333)
Visitor Counter : 165