वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रीय मान्यता प्रणालीची जगात पाचव्या स्थानावर झेप, गुणवत्तायुक्त पायाभूत सुविधा प्रणालीचे पहिल्या 10 क्रमांकांमध्ये स्थान कायम

Posted On: 09 FEB 2023 7:53PM by PIB Mumbai

नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक पायाभूत सुविधा दर्जा निर्देशांक  2021 मध्ये भारतीय गुणवत्ता परिषदे  अंतर्गत भारताच्या राष्ट्रीय मान्यता प्रणालीने जगात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पायाभूत सुविधांच्या गुणवत्ता  आधारित जागतिक पायाभूत सुविधा  निर्देशांक  जगातील 184 अर्थव्यवस्थांची क्रमवारी ठरवतो. भारताची एकूण गुणवत्ता प्रणाली जगात पहिल्या 10 क्रमांकात, 10 व्या स्थानावर कायम असून, मानकीकरण प्रणाली  जगात 9 व्या आणि मेट्रोलॉजी प्रणाली  21 व्या स्थानावर आहे.   

 

स्रोत: GQII https://gqii.org/ 

‘गुणवत्ता सर्वप्रथम’, हा दृष्टीकोन असलेल्या अमृत काळातील नवीन भारताची ही ओळख आहे. भारतातील तीन गुणवत्ता प्रणाली स्तंभांपैकी देशाची मान्यता प्रणाली, ही सर्वात नवीन आहे, आणि या क्रमवारीत आपण एका वर्षात जगात पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्त्वाखाली, गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या पायावर ‘मेड इन इंडिया’ हा जागतिक स्तरावर विश्वासार्ह ब्रँड बनवण्यासाठी, भारतीय गुणवत्ता परिषद  वचनबद्ध आहे.

मेट्रोलॉजी, मानकीकरण, मान्यता आणि व्यापार भागीदारांमध्ये विश्वासार्हता आणि विश्वास प्रदान करणाऱ्या अनुरूप मुल्यांकन सेवा पुरवणारा गुणवत्ता हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तांत्रिक कणा आहे. 

चांचणी, प्रमाणन, तपासणी इत्यादी करणार्‍या अनुरूपता मूल्यांकन संस्थांची  क्षमता आणि विश्वासार्हता स्थापित करण्यामध्ये मान्यता प्रणाली सहाय्य करते.  आंतरराष्ट्रीय मानकांनुसार राष्ट्रीय मान्यता प्रणाली ही भारतीय गुणवत्ता परिषदेने  स्थापन केली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार , वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि भारतीय उद्योग प्रोत्साहन विभाग यांनी एकत्रितपणे 1997 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. भारताच्या मान्यता क्रमवारीतील सुधारणेसाठी, राष्ट्रीय मान्यता प्रणाली अंतर्गत अनुरूपता मूल्यमापन संस्थेची  स्थिर वाढ कारणीभूत आहे. या चाचणी आणि वैद्यकीय प्रयोगशाळा, उत्पादन प्रमाणीकरण संस्था आणि व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन संस्था आहेत.

जागतिक पायाभूत सुविधा दर्जा निर्देशांक  क्रमवारी, वर्षाच्या शेवटपर्यंत गोळा केलेल्या डेटाच्या आधारे प्रकाशित आणि सादर केली जाते. मेट्रोलॉजी, मानकीकरण, मान्यता आणि संबंधित सेवांबाबतचा हा एक उपक्रम असून, त्याला Physikalisch-Technische Bundesanstalt (PTB) आणि फेडरल मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (BMZ), जर्मनी यांचे पाठबळ  आहे. 

***


Gopal C/ R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1897870) Visitor Counter : 263


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu