अंतराळ विभाग
अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या 135 बिगर-शासकीय संस्थांकडून (NGE) इन-स्पेस (IN-SPACE) कडे आतापर्यंत 135 अर्ज जमा झाल्याची केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती
Posted On:
08 FEB 2023 5:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज माहिती दिली की, अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या 135 बिगर-शासकीय संस्थांकडून (NGE) इन-स्पेस (IN-SPACE) कडे आतापर्यंत 135 अर्ज जमा झाले आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्स बाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना, पटलावर मांडलेल्या निवेदना द्वारे माहिती दिली की, भारतीय अंतराळ स्टार्ट-अप्सना प्रारंभिक आर्थिक सहाय्य देण्यासाठी ईन-स्पेस बोर्डाने नवीन सीड फंड (बीज-निधी) योजनेला मंजुरी दिली आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, बिगर-सरकारी संस्थांमध्ये (NGEs) परदेशी गुंतवणूक (एफडीआय) यावी, यासाठी अंतराळ क्षेत्राबाबतचे सुधारित एफडीआय धोरण आणि राष्ट्रीय अंतराळ धोरणाला सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरु आहे.
देशातील अंतराळ तंत्रज्ञान आधारित उद्योगासाठी केलेली एकूण आयात आणि निर्यातीच्या तपशीलाबाबतच्या प्रश्नावर, या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये विविध प्रकल्प/कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी 2,114 कोटी (अंदाजे) रुपये किमतीच्या वस्तूंची आयात करण्यात आली.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897394)
Visitor Counter : 187