इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतातील डिजिटल व्यवहार
Posted On:
08 FEB 2023 3:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
भारतीय अर्थव्यवस्थेत डिजिटल व्यवहारांचा विस्तार करण्यासाठी आणि त्याद्वारे वित्तीय क्षेत्राची गुणवत्ता आणि ताकद अधिक वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. केंद्र सरकार म्हणून सर्व विभागांनी आणि इतर संबंधित घटकांनी केलेल्या समन्वयीत प्रयत्नांमुळेच डिजिटल पेमेंट व्यवहार वाढले आहेत. 2017-18 साली या व्यवहारांची संख्या 2,071 कोटी इतकी होती, ती 2021-22 साली 8,840 कोटी इतकी झाली आहे. (स्त्रोत: आरबीआय, एनपीसीआय आणि बँका)
गेल्या पाच वर्षात, डिजिटल पेमेंटच्या विविध सोपे आणि सुलभ पद्धती आणि साधने, जसे की, भारत इंटरफेस फॉर मनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (BHIM-UPI), इमीडिएट पेमेंट सर्विस (IMPS), आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स टोल कलेक्शन(NETC) यांच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, पी2पी म्हणजे व्यक्ती-व्यक्तीमधील व्यवहार आणि पी2एम म्हणजे, व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील व्यवहार वाढल्यामुळे, डिजिटल पेमेंट व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन आले आहे. भीम युपीआय हे अशा डिजिटल व्यवहारांसाठी नागरिकांचे पसंतीचे पेमेंट साधन ठरले आहे. जानेवारी, 2023 मध्ये, या अॅपद्वारे 12.98 लाख कोटी रुपयांचे 803.6 कोटी डिजिटल व्यवहार करण्यात आले.
डिजिटल पेमेंट व्यवहारांची गेल्या पाच वित्तीय वर्षातील तसेच चालू आर्थिक वर्षातील एकूण आकडेवारी खालीलप्रमाणे:
Financial Year
(FY)
|
Total number of digital transactions
(in crore) #
|
2017-18
|
2,071
|
2018-19
|
3,134
|
2019-20
|
4,572
|
2020-21
|
5,554
|
2021-22
|
8,840
|
2022-23
|
9,192*
|
* Data till 31st December2022
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तराद्वारे माहिती दिली.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897305)
Visitor Counter : 542