राष्ट्रपती कार्यालय

भूतानच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

Posted On: 07 FEB 2023 7:09PM by PIB Mumbai

 

भूतानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष वांगचुक नामग्याल यांच्या अध्यक्षतेखाली भूतानच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (7 फेब्रुवारी, 2023) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

भूतानच्या शिष्टमंडळाचे राष्ट्रपतींनी स्वागत केले आणि त्या म्हणाल्या की, भारत आणि भूतान यांच्यातील बहुआयामी आणि आगळ्या मैत्रीचा आपण मनापासून सन्मान करतो. भूतानच्या जनतेच्या आकांक्षा आणि प्राथमिकता लक्षात घेऊन भूतानबरोबरचे उत्तम द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूतानला, सर्वांसाठी समृद्धी हा आपला दृष्टीकोन साकारता यावा म्हणून, भारताने, भूतानबरोबर अंतराळ सहकार्य, स्मार्ट शेती, युवा आणि क्रीडा, स्टार्ट-अप, शाश्वत ऊर्जा आणि डिजिटल विकास यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रपतींनी नमूद केले की 2034 पर्यंत उच्च उत्पन्न अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भूतानच्या वाटचालीत त्याला  भारतामध्ये नेहमीच एक विश्वासार्ह मित्र गवसेल.   

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897079) Visitor Counter : 133