रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे “हायड्रोजन फॉर हेरिटेज” अर्थात “वारसा संवर्धनासाठी हायड्रोजन” अभियाना अंतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन – रेल्वेगाडी चालवणार आहे
इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर करणे हे हरित वाहतूक तंत्रज्ञानाच्या दिशेने अधिक प्रगती करण्यासाठी लाभदायक आहे
Posted On:
03 FEB 2023 8:53PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वे (IR) ने "हायड्रोजन फॉर हेरिटेज" अभियाना अंतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची अभिनव संकल्पना मांडली आहे. यासाठी प्रति ट्रेन अंदाजे 80 कोटी रुपये तर विविध वारसा स्थळे /पहाडी मार्गांवर पायाभूत सुविधा निर्मितीसाठी प्रति मार्ग 70 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
याशिवाय, भारतीय रेल्वे सध्याच्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (DEMU) रेकवर हायड्रोजन इंधन सेलच्या रेट्रो फिटमेंट अर्थात योग्य ते बदल करण्याच्या उद्देशाने 111.83 कोटी रुपये खर्चाच्या पायाभूत सेवा सुविधांच्या निर्मित्साठी एक प्रायोगिक प्रकल्प देखील राबवणार आहे. ही रेल्वे उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत विभागात चालवण्याची योजना आहे.
उत्तर रेल्वेच्या जिंद-सोनीपत विभागावरील पहिल्या प्रोटोटाइपची प्रत्यक्ष चाचणी 2023-2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनचा वाहतुकीदरम्यानचा प्रत्यक्ष खर्च किती असेल याचे अनुमान भारतीय रेल्वेच्या सध्याच्या परिचालन खर्चात लावलेले नाही किंवा उपलब्ध नाही. हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेनचा आरंभीचा खर्च अधिक असेल आणि जसजशी गाड्यांची संख्या वाढत जाईल, तसतसा तो कमी होत जाईल, असा अंदाज आहे. याशिवाय , स्वच्छ उर्जा स्रोत म्हणून हायड्रोजनचा वापर इंधनाच्या स्वरुपात करून शून्य कार्बन उत्सर्जन उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी ही योजना हरित वाहतूक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने लाभदायक आहे.
रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
S.Patil/B.Sontakke/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896181)
Visitor Counter : 244