महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे 6 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत परीक्षा पर्व 5.0 अभियानाचे आयोजन
Posted On:
03 FEB 2023 7:41PM by PIB Mumbai
मागील वर्षी प्रमाणेच पंतप्रधानांच्या "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) यावर्षी 6 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत परीक्षा पर्व 5.0 या अभियानाचे आयोजन केले आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी आणि तज्ञ/प्रसिद्ध व्यक्ती/प्रेरक वक्त्यांकडून मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या उपयुक्त सूचना मिळवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा "परीक्षा पर्व 5.0" हा प्रयत्न आहे. अशा तणावाच्या काळात, बहुतांश मुलांचा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि परीक्षेला एखाद्या उत्सवासारखा आनंददायी उपक्रम बनवण्याच्या अनुषंगाने, विद्यार्थ्यांना अस्वस्थ करणारे आणि गोंधळात टाकणारे विचार मांडणे आणि सामायिक करणे टाळून त्यांना अन्य विचारांनी प्रेरित केल्याने विद्यार्थ्यांचा तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यासोबतच शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने एनसीपीसीआरकडून यावर्षी बहुआयामी दृष्टिकोनाचा अवलंब केला जात आहे. परीक्षा पर्व 5.0 मध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत;
थेट प्रसारण सत्रे - एनसीपीसीआरच्या फेसबुक/ट्विटर आणि यूट्यूब समाजमाध्यमांवर आणि एनसीपीसीआरचे सर्जनशील भागीदार न्यू इंडिया जंक्शनच्या समाजमाध्यमांद्वारे ,परीक्षेचा दबाव आणि तणाव या विषयांसह सायबर सुरक्षा, अंमली पदार्थांचा गैरवापर प्रतिबंध,ऑनलाइन शिक्षण, सुरक्षा आणि सुरक्षितता, पॉक्सो , करिअर समुपदेशन इ. विषयांवर मानसिक आरोग्य क्षेत्रातील नामवंत व्यक्ती/तज्ञ, प्रेरक वक्ते/शिक्षणतज्ज्ञ/सायबर कायदा तज्ञ, योग गुरु, स्टार्ट अप्सचे संस्थापक हे विद्यार्थी , पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधतील.फेब्रुवारी 2023 च्या थेट प्रसारण सत्रांचे वेळापत्रक जोडण्यात आले आहे.
एक्झाम वॉरियर्स - "परीक्षा पर्व 5.0" अंतर्गत हा उपक्रम परीक्षा / निकाल संबंधित तणाव आणि चिंता व्यवस्थापित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑडिओ-व्हिडिओ संदेश प्रसारित करणारा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी स्वत:ची नोंदणी करू शकतात आणि त्यांचे व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केल्यानंतर http://parikshaparv.in/ वर अपलोड केले जातील. त्यानंतर निवडक ऑडिओ-व्हिडिओ संदेश एनसीपीसीआरच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यम हँडल्सवर अपलोड केले जातील.
माननीय पंतप्रधानांच्या "परीक्षा पे चर्चा" 2023 च्या ध्वनिमुद्रित संदेशांसह परीक्षा पर्व 5.0 वर विविधभारती (राष्ट्रीय), आकाशवाणीवर रेडिओ स्पॉट्सच्या माध्यमातून प्रसारित केले जातील;
संवेदना - (1800-121-2830) टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकाल संबंधित चिंता, तणाव आणि अस्वस्थता यावर मात करण्यासाठी योग्य आणि प्रशिक्षित समुपदेशकांद्वारे एनसीपीसीआर ची टोल-फ्री टेली समुपदेशन सेवा.
विद्यार्थ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी, सर्व शाळांसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल संगोपन संस्था यांच्यामार्फत आदेश जारी करणे आणि विद्यार्थी आणि मुलांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी एनसीपीसीआरने सर्व राज्य सरकारच्या शिक्षण, महिला आणि बालविकास किंवा समाजकल्याण विभाग, शिक्षण मंडळे यांसारख्या संबंधित विभागांना पत्र पाठवले आहे . या आदेशाची प्रत आयोगाने मागवली आहे.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896142)
Visitor Counter : 238