अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

सरकारने परदेशी संस्थांना इस्रोच्या सुविधा वापरण्याची परवानगी दिलेली नाही तसेच केवळ बिगर -सरकारी भारतीय संस्थांना इस्रो सुविधा आणि तांत्रिक सहाय्य वापरण्याची परवानगी आहे -केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 02 FEB 2023 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

केंद्रीय  विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार);  भू विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  (स्वतंत्र प्रभार)डॉ जितेंद्र सिंह म्हणाले  की, सरकारने परदेशी संस्थांना इस्रोची सुविधा वापरण्याची परवानगी दिलेली  नाही आणि केवळ बिगर -सरकारी भारतीय संस्थांना  इस्रोची  सुविधा आणि इन -स्पेस  द्वारे तांत्रिक सहाय्य वापरण्याची परवानगी दिली जात आहे .

बिगर -सरकारी भारतीय संस्थांद्वारे वापरण्यात आलेल्या अलिकडील सुविधांमध्ये स्कायरूट कंपनीने त्यांच्या मिशन प्रारंभ  साठी वापरलेले  श्रीहरीकोटा येथील साउंडिंग रॉकेट लॉन्च कॉम्प्लेक्स आणि अग्निकुल कॉसमॉस प्रा. लि ने अग्निलेट या  इंजिनच्या चाचणीसाठी  तिरुवनंतपुरम येथील थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन सुविधेचा समावेश असल्याचे  डॉ जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात  सांगितले.

सरकार अंतराळ क्षेत्रातल्या विविध कार्यक्रमांच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या अंमलबजावणीसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.  शैक्षणिक संस्था, स्टार्ट-अप आणि उद्योगांसह खाजगी क्षेत्राचा संपूर्ण प्रक्रियेत  सहभाग अपेक्षित आहे, ज्यामुळे राष्ट्रीय अंतराळ विषयक  अर्थव्यवस्थेचा विस्तार होईल, अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, एक समृद्ध अंतराळ परिसंस्था निर्माण होईल आणि परिणामी जागतिक अंतराळ विषयक  अर्थव्यवस्थेत  भारताचा दीर्घकालीन वाटा वाढेल, असे ते म्हणाले.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1895883) आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Kannada