कायदा आणि न्याय मंत्रालय

मतदार ओळखपत्राच्या प्रमाणीकरणात ‘आधार’ महत्वाचे

Posted On: 02 FEB 2023 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

मतदार यादी अचूक करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. यात नावनोंदणी पासून सुरु होणाऱ्या प्रत्येक टप्प्यात, राजकीय पक्षांसह विविध संबंधित घटकांचा समावेश असतो. त्यात मतदारांची नोंदणी, निवासस्थान, विवाह आदींमुळे झालेले बदल नोंदवण्यासाठी मतदार यादीत दुरुस्ती केली जाते. या प्रक्रियेत निवडणूक नोंदणी अधिकारी विविध दस्तऐवजांवर अवलंबून असतो. तो प्रत्यक्ष पडताळणी करुन काही आक्षेप असल्यास, ते दूर करतो. निवडणूक कायदे (सुधारणा) अधिनियम, 2021 मध्ये इतर बाबींबरोबरच, मतदार नोंदणी अधिकाऱ्याला, मतदार यादीतील नोंदींच्या प्रमाणीकरणासाठी आधार क्रमांक देखील आवश्यक असू शकतो असे सुचवले आहे. कायदा आणि न्याय मंत्री, किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

त्यामुळे, मतदार याद्या अचूक करण्यासाठी प्रमाणीकरण आणि पडताळणीत आधार हे अनेक दस्तऐवजांपैकी एक आहे. भारत निवडणूक आयोगानुसार, मतदार ओळखपत्र माहिती साठ्यात (डेटाबेसमधे) नोंदणी केलेल्या व्यक्तीं संदर्भात, 01.01.2023 रोजी मतदार यादीच्या अंतिम प्रकाशनानुसार, नोंदणी केलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 94,50,25,694 होती. याबाबत आणखी माहिती संकलित केली जात असून ती सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1895861) Visitor Counter : 124


Read this release in: English , Urdu , Tamil