नागरी उड्डाण मंत्रालय

कोलकाता, पुणे, विजयवाडा आणि हैदराबाद विमानतळांवर मार्च 2023 पर्यंत डिजी यात्रेची अंमलबजावणी केली जाणार

Posted On: 02 FEB 2023 8:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

डिजी यात्रा धोरण हे  चेहरा ओळखण्याच्या  तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणालीसाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. विमानतळावर प्रवाशांना वेगवान आणि कुठल्याही त्रासापासून मुक्त असा अनुभव प्रदान करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये विविध  टच पॉइंट्सवर तिकीट आणि ओळखपत्राच्या पडताळणीची गरज असणार नाही तसेच डिजिटल व्यवस्थेचा वापर करून विद्यमान पायाभूत सुविधांद्वारे प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वीची प्रक्रिया वेगाने पार पाडून तणावरहित अनुभव प्रदान करणे  हा त्याचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. डिजी यात्रेच्या अंमलबजावणीचा खर्च विमानतळ चालकांकडून केला जाणार आहे.  त्याच्या अंमलबजावणीसाठी  नागरी विमान वाहतूक मंत्रालय कोणतीही  अर्थसंकल्पीय तरतूद करत नाही. डिजी यात्रेला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी, विमानतळ चालक  आणि विमान कंपन्यांकडून  विमानात घोषणा, बोर्डिंग पासद्वारे प्रसिद्धी, मदत कक्षाद्वारे सहाय्य प्रदान करणे आणि विमानतळांवर बॅनर आणि लघुपट  प्रदर्शित करणे यांसारखे  प्रयत्न  करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रसिद्धी केली जात आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोलकाता, पुणे, विजयवाडा आणि वाराणसी विमानतळांवर बायोमेट्रिक बोर्डिंग प्रणाली लागू करण्याचे काम सोपवले आहे.

डिजी यात्रा टप्प्याटप्प्याने सर्व विमानतळांवर राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात, चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रवाशांना संपर्करहित , कागदविरहित चेक-इन आणि बोर्डिंग सुविधा  प्रदान करण्यासाठी दिल्ली, बंगळुरू आणि वाराणसी विमानतळांवर 1.12.2022 रोजी डिजी यात्रा सुरू करण्यात आली आहे. मार्च 2023 पर्यंत कोलकाता, पुणे, विजयवाडा आणि हैदराबाद विमानतळांवर आणि टप्प्याटप्प्याने देशातील विविध विमानतळांवर पहिल्या टप्प्यात डिजी यात्रेची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. विमान वाहतूक क्षेत्राचे डिजिटल परिवर्तन ही सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. आवश्यकतेनुसार विमान वाहतूक क्षेत्रातील विविध प्रक्रियांचे डिजिटायझेशन हाती घेण्यात आले आहे. 

मे. डेटाईव्हॉल्व सोल्युशन्सने एफआरटी आधारित डिजी यात्रा सेंट्रल इकोसिस्टम तयार केली आहे. अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत नीती आयोगाच्या  राष्ट्रीय स्टार्ट-अप चॅलेंजच्या माध्यमातून त्याची निवड करण्यात आली आहे. 

डिजी यात्रा ही प्रवाशांना विमानतळांवर वेगवान  आणि अडचण मुक्त अनुभव देण्यासाठी एक ऐच्छिक सुविधा आहे. डिजी यात्रा प्रक्रियेत, प्रवाशांच्या वैयक्तिक  ओळखपत्राशी संबंधित माहिती संकलित केली जात  नाही. प्रवाशांचा सर्व डेटा प्रवाशाच्या स्मार्टफोनच्या वॉलेटमध्ये एन्क्रिप्ट आणि संग्रहित केला जातो आणि प्रवासाच्या मूळ ठिकाणी  मर्यादित कालावधीसाठी शेअर केला जातो जेथे प्रवाशाच्या डिजी यात्रा आयडीची पडताळणी करणे आवश्यक असते. उड्डाणाच्या  24 तासांच्या आत सिस्टममधून डेटा काढून टाकला जातो. डिजी यात्रेच्या अंमलबजावणीमुळे एफआरटी द्वारे टचलेस पॅसेंजर व्हॅलिडेशन केले जाते , ज्यामुळे विमानतळावर प्रवेश, सिक्युरिटी होल्ड एरिया आणि बोर्डिंग एरिया सारख्या विविध टचपॉईंटवर वेळ वाचतो आणि यामध्ये सीआयएसएफचा हस्तक्षेप राहत नाही.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895855) Visitor Counter : 160


Read this release in: English , Urdu , Bengali