अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ महेंद्र नाथ पांडे हरियाणातील मनेसर येथे 4 फेब्रुवारीला करणार “पंचामृताच्या दिशेने” या कार्यक्रमाचे उद्घाटन


या कार्यक्रमात मोटर वाहन (ऑटोमोटिव्ह) उद्योगाला चालना देण्यासाठी मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारांवर परिषद आणि प्रदर्शनाचा समावेश

उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) – ऑटो, पीएलआय ॲडवान्स्ड केमिस्ट्री सेल (एसीसी), भांडवली वस्तू 2 आणि फेम इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादन (फेम) योजना या अवजड उद्योग मंत्रालयाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी परिषद

प्रगत ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान आणि वाहनांचे प्रदर्शन

Posted On: 02 FEB 2023 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 फेब्रुवारी 2023

 

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांच्या हस्ते हरियाणातील मानेसरच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) येथे 4 फेब्रुवारी 2023 रोजी  "पंचामृताच्या दिशेने’’  या एकदिवसीय महा उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कॉप 26 - 'पंचामृत की सौगात' या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणांच्या अनुषंगाने  देशातील ऑटोमोटिव्ह उद्योगाला चालना देण्यासाठी आणि विकासासाठी मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे आणि राज्यमंत्री कृष्ण पाल आयसीएटी इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटनही करतील. या कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह उद्योगातील कंपन्या, निती आयोग तसेच अवजड उद्योग मंत्रालय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, नवीन आणि अपारंपारिक ऊर्जा मंत्रालय,  पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, स्टार्ट-अप आणि विद्यार्थी यांचाही सहभाग दिसेल.

उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजना (पीएलआय) –ऑटो, पीएलआय ॲडवान्स्ड केमिस्ट्री सेल  (एसीसी), भांडवली वस्तू 2 आणि फेम इलेक्ट्रिक वाहनांचा वेगवान अवलंब आणि उत्पादन (फेम) योजना या योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी ऑटोमोटिव्ह उद्योग आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसोबत एक समर्पित संवादात्मक सत्र देखील नियोजित आहे. या योजनांचा उद्देश नावीन्यपूर्ण परिसंस्थेचा विकास करणे हे आहे.  त्यामुळे ग्रीन आणि क्लीन मोबिलिटी सोल्यूशन्स सक्षम करेल आणि कार्बन फूट प्रिंट कमी करण्यात मदत होणार आहे.

तांत्रिक सत्रांमध्ये हायड्रोजन, ईव्ही, जैवइंधन आणि गॅस इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जाईल. या नवीन तंत्रज्ञानाच्या जलद रुपांतरासाठी धोरण आणि नियामक परिसंस्था यावर विचार केला जाईल आणि भविष्यातील दिशादर्शक ठरवण्यासाठी मदत करेल.

आयसीएटी इन्कुबेटर सेंटर म्हणजेच ‘उष्मायन केंद्र’  स्टार्टअप्सचा विकास करेल आणि त्यांना बाजारपेठेसाठी तयार उत्पादने विकसित करण्यात मदत मिळेल.

आयसीएटी मध्ये उपलब्ध असलेल्या  चाचणी आणि प्रमाणन पायाभूत सुविधा देखील उपस्थितांना दाखवण्‍यात येतील.

 

* * *

S.Bedekar/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1895704) Visitor Counter : 236


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil