अर्थ मंत्रालय
2022-23 या आर्थिक वर्षासाठी, भारत सरकारच्या खात्यांचा डिसेंबर 2022 पर्यंतचा मासिक आढावा
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
भारत सरकारचे डिसेंबर 2022 पर्यंतचे मासिक खाते एकत्रित करण्यात आले आहे आणि त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत:
भारत सरकारला डिसेंबर 2022 पर्यंत 18,25,100 कोटी रुपये (एकूण प्राप्ती 2022-23 च्या 79.9%) प्राप्त झाले आहेत. यामध्ये रु. 15,55,692 कोटी कर महसूल (केंद्रसरकारला एकूण मिळाले),रु. 2,14,302 कोटी बिगर-कर महसूल आणि रु. 55,106 कोटी बिगर-कर्ज भांडवली पावत्यांचा समावेश आहे. बिगर-कर्ज भांडवली पावत्यांमध्ये 16,435 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली आणि 38,671 कोटी रुपयांच्या विविध भांडवली पावत्यांचा समावेश आहे. या कालावधीपर्यंत भारत सरकारकडून 6,09,437 कोटी रुपये राज्य सरकारांना कराचा वाटा म्हणून हस्तांतरित करण्यात आले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 1,59,127 कोटी रुपये जास्त आहेत. भारत सरकारने केलेला एकूण खर्च 28,18,076 कोटी रुपये (2022-23 च्या 71.4%) असून, त्यापैकी 23,28,132 कोटी रुपये महसूल खात्यावर, तर 4,89,944 कोटी रुपये भांडवली खात्यावर खर्च झाले. एकूण महसुली खर्चापैकी 6,80,853 कोटी रुपये व्याजाच्या देयकांवर आणि 3,50,524 कोटी रुपये मोठ्या अनुदानापोटी खर्च झाले.
* * *
S.Thakur/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1895191)
आगंतुक पटल : 282