संरक्षण मंत्रालय

प्रजासत्ताक दिन संचलन 2023 मध्ये सर्वोत्तम पथक आणि सर्वोत्तम चित्ररथांची घोषणा


परीक्षक समितीकडून उत्तराखंडची सर्वोत्तम राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या चित्ररथासाठी निवड, महाराष्ट्राला मिळाला दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम चित्ररथाचा मान

माय गव्ह वर घेण्यात आलेल्या ऑनलाईन सार्वजनिक चाचणीमध्ये गुजरात सर्वोत्तम

Posted On: 30 JAN 2023 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2023

 

प्रजासत्ताक दिन संचलन 2023च्या सर्वोत्तम पथकांची आणि चित्ररथांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये परीक्षकांच्या समितीने जाहीर केलेले आणि माय जीओव्हीने घेतलेल्या ऑनलाईन सार्वजनिक चाचणीचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात आले आहेत.

तिन्ही सेना दलांची संचलन पथके, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची(सीएपीएफ) / इतर सहाय्यक दलांची संचलन पथके आणि विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये/विभाग यांचे चित्ररथ यांच्या प्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी परीक्षकांची तीन पॅनेल्स तयार करण्यात आली होती. या पॅनेलनी केलेल्या मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आलेले निकाल खालीलप्रमाणे आहेत :

  • तिन्ही सेना दलांमध्ये सर्वोत्तम संचलन करणारे पथक- पंजाब रेजिमेंट सेंटरचे पथक
  • सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांपैकी सर्वोत्तम संचलन करणारे पथक- सीआरपीएफ संचलन पथक
  • सर्वोत्तम तीन चित्ररथ (राज्ये/ केंद्रशासित प्रदेश)
  • प्रथम - उत्तराखंड (मानसखंड)
  • द्वितीय - महाराष्ट्र (साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती)
  • तृतीय – उत्तर प्रदेश (अयोध्या दीपोत्सव)
  • सर्वोत्तम चित्ररथ ( मंत्रालये/विभाग) – आदिवासी व्यवहार मंत्रालय (एकलव्य आदर्श निवासी शाळा (EMRSs))
  • विशेष पारितोषिक
  • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ( जैवविविधता संवर्धन)
  • ‘वंदे भारतम’ नृत्य समूह.

परीक्षकांच्या पॅनल व्यतिरिक्त माय जीओव्ही प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिन संचलन आणि बिटिंग द रिट्रिट सोहळा ऑनलाईन पाहणाऱ्या नागरिकांच्या नोंदणीसाठी एक वेबपेज तयार करण्यात आले. यावर आपल्या आवडीची राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि मंत्रालये विभाग यांचा चित्ररथ निवडण्यासाठी तसेच संचलन करणाऱ्या पथकांमधून सर्वोत्तम पथक निवडण्यासाठी लोकप्रिय श्रेणी अंतर्गत नागरिकांचे ऑनलाईन मतदान घेण्यात आले 

जानेवारी 25 ते 28 2023 दरम्यान लोकप्रिय पर्यायासाठी माय जीओव्ही वेबपेजवर ऑनलाईन मतदान आयोजित करण्यात आले

याचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत:

  • तिन्ही सेना दलांमध्ये सर्वोत्तम संचलन करणारे पथक- भारतीय हवाई दलाचे संचलन पथक
  • सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांपैकी सर्वोत्तम संचलन करणारे पथक- सीआरपीएफ संचलन पथक T
  • सर्वोत्तम तीन चित्ररथ (राज्ये/ केंद्रशासित प्रदेश)
  • प्रथम - गुजरात (स्वच्छ-हरित ऊर्जा कार्यक्षम गुजरात)
  • द्वितीय – उत्तर प्रदेश ( अयोध्या दीपोत्सव)
  • तृतीय - महाराष्ट्र (साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्ती)
  • सर्वोत्तम चित्ररथ(केंद्रीय मंत्रालये / विभाग) - सीएपीएफ ( गृह मंत्रालय)


* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894819) Visitor Counter : 1439


Read this release in: English , Urdu , Hindi