रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आरपीएफ/आरपीएसएफ जवानांना जीवन रक्षा पदक पुरस्काराने केले सन्मानित

Posted On: 30 JAN 2023 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2023

 

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू  यांनी आरपीएफ/आरपीएसएफ जवानांना जीवन रक्षा पदक पुरस्काराने सन्मानित केले आहे, त्यांची नावे याप्रमाणे-

  1. जीवन रक्षा पदक – जयपाल सिंह, हेड कॉन्स्टेबल / उत्तर रेल्वे
  2. जीवन रक्षा पदक - सुरेंद्र कुमार, कॉन्स्टेबल/उत्तर रेल्वे
  3. जीवन रक्षा पदक – बुधा राम सैनी, कॉन्स्टेबल/7वी बीएन/आरपीएसएफ

निजामुद्दीन रेल्वे स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 12.05.2022 रोजी, दुपारी 4 वाजताच्या सुमाराला  बीपीटीएन वॅगन क्र. 40121185538 ला तांत्रिक कारणामुळे आग लागली.  त्यावेळी सुमारे 1000 व्यक्ती या ठिकाणी काम करत होत्या.  आगीने भीषण रूप धारण केल्याचे पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले.  जीव वाचवण्यासाठी कामगार भयभीत होऊन सैरावैरा धावू लागले होते.

हेड कॉन्स्टेबल जयपाल सिंग, कॉन्स्टेबल सुरेंद्र कुमार आणि कॉन्स्टेबल बुधा सैनी कामावर तैनात होते. त्यांनी अदम्य साहस दाखत, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, अत्यंत ज्वलनशील पदार्थाने (नाफ्था) भरलेल्या बीपीटीएन वॅगनला लागलेली भीषण आग अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने विझवली. ही आग तात्काळ आटोक्यात आली नसती तर ती अत्यंत ज्वलनशील पदार्थाने (नाफ्था) भरलेल्या एकूण 18 बीटीपीएन वॅगनमध्ये पसरली असती. त्यामुळे मोठा अपघात होऊन हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असते. 

जयपाल सिंग, सुरेंद्र कुमार आणि बुधराम सैनी यांनी आपले प्राण पणाला लावत सुमारे 1000 जणांचे जीव आणि रेल्वेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वाचवली आहे. हे कौतुकास्पद कार्य आहे.

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1894793) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu