माहिती आणि प्रसारण मंत्रालय

तंत्रज्ञान सक्षमता, वितरणाचे भवितव्य आणि विविध संस्कृतींच्या सहयोग संधी यावर एससीओ चित्रपट महोत्सवात चर्चा


एससीओ चित्रपट महोत्सवात सिनेमॅटिक अनुभवात होत असलेल्या आमूलाग्र बदलाबद्दल झालेल्या चर्चेने प्रेक्षकांना दिला समृध्द अनुभव 

Posted On: 29 JAN 2023 7:09PM by PIB Mumbai

 

मुंबईत सुरु असलेल्या शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध भागधारकानी सहभाग नोंदवला. डोन्ट बरी मी विदाऊट इव्हानयासारख्या चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड  प्रतिसाद लाभला  तसेच कार्यशाळा आणि विविध चर्चासत्रे यामुळे या महोत्सवाचा तिसरा दिवसही भरगच्च कार्यक्रमांचा ठरला. आज दाखवण्यात आलेल्या इतर चित्रपटांमध्ये किर्गिस्तानमधील जूकर, भारतातील गंगूबाई काठियावाडी, उझबेकिस्तानमधील मेरोस आणि तुर्की चित्रपट किस्पेट यांचा समावेश होता.

डब्सवर्क मोबाईलचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आदित्य कश्यप यांनी सिनेबड्सनावाच्या ऍप्लिकेशनचे प्रदर्शन करणारी कार्यशाळा यावेळी घेतली. याअॅपमध्ये सिनेप्रेमींना त्यांच्या आवडीच्या भाषेत ऑडिओ देऊन त्यांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याची सुविधा आहे. हे अॅप पहिल्या 10 लाख सदस्यांसाठी विनामूल्य उपलब्ध असेल, असेही आदित्य कश्यप यांनी यावेळी जाहीर केले.

भारत आणि जगभरात चित्रपट वितरणाचे भविष्यया विषयावर चर्चा झाली. चीनच्या एसीओ चित्रपट महोत्सवाच्या ज्युरी सदस्य निंग यिंग, 91 फिल्म स्टुडिओचे संस्थापक आणि सीईओ नवीन चंद्र, चित्रपट निर्माते सुनीर खेत्रपाल आणि प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष शिबाशिष सरकार यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. महामारी आणि मंदीचा सिनेमावर विपरीत परिणाम झाला आहे, असे यावेळी तज्ञांनी अधोरेखित केले. मात्र, आता ओटीटी प्लॅटफॉर्म आल्यामुळे, सिनेमाच्या भविष्याचे चित्र आशादायी असेल, असे सांगत, ओटीटी मुळे सिनेमाचा आशय अधिक समृद्ध झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आजच्या दिवशीचा शेवटचा परिसंवाद- इन कॉन्वरसेशन  हा संस्कृती, व्यक्तिरेखा आणि देश यांचा संगम, या संकल्पनेवर झाला. या चर्चासत्रात, आर्मेनियाचे दिग्दर्शक गुरेश गझारियन आणि हायक ऑर्डियन आणि कझाकस्तानचे बोलात कालिम्बेटोव्ह यांनी सहभाग घेतला.  त्यांनी युवा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना, एससीओ प्रदेशातील चित्रपटांच्या सह-निर्मितीत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी  प्रोत्साहन दिले जावे, असा विचार मांडला. प्रेम आणि मैत्रीसारख्या भावना आता चित्रपटांमधून व्यक्त होणे कमी झाले आहे, ह्या भावना पुन्हा सिनेमामधून अभिव्यक्त करण्यासाठी रेट्रो चित्रपट तयार करावेत असे आवाहन केले. तसेच, परस्पर सहकार्य वाढवण्यात लघुपटांची भूमिका महत्वाची आहे, हे ही या सत्रात अधोरेखित करण्यात आले.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894533) Visitor Counter : 162


Read this release in: Urdu , English , Hindi