माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात, कझाक गायक आणि संगीतकार दिमाश कुदायबर्गेन यांनी संगीतनिर्मिती आणि सीमांची बंधने ओलांडून जाणाऱ्या संगीताविषयी केले मार्गदर्शन
संगीत भाषांची बंधने ओलांडून प्रवास करते: दिमाश कुदायबर्गेन
Posted On:
28 JAN 2023 7:54PM by PIB Mumbai
मुंबई | 28 जानेवारी 2023
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात, आज दुसऱ्या दिवशी, कझाक गायक आणि संगीतकार, दिमाश कुदायबर्गेन यांनी, फायर साईड चाट या अनौपचारीक गप्पांच्या कार्यक्रमात, आपला संगीतप्रेमी ते स्टार संगीतकार होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. ‘संगीत देणे,बंधमुक्त होणे’ या विषयावरील सत्राला संबोधित करतांना त्यांनी या महोत्सवातील स्पर्धा गटात ज्यूरी म्हणून जबाबदारी पार पडण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
दिमाश कुदायबर्गेन, जे स्वतः 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये गाऊ शकतात, त्यांनी, या सत्रात, कोणत्याही नागरी संस्कृतीच्या विकासात, संगीताचे काय महत्त्व असते हे अधोरेखित केले. वयाच्या 22 व्या वर्षी एका चीनी संगीत स्पर्धेत, विजयी झाल्यानंतर, त्यांचे आयुष्यच कसे बदलून गेले, हे त्यांनी सांगितले. इतकेच नाही, तर त्यांचा सुरुवातीच्या काळातील प्रवास, त्यांनी जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडला. आपल्याला जगातील दैवी गूढ शक्तीपासून प्रेरणा मिळते, असे सांगत, ह्या युवा संगीतकाराने, आपले सुप्रसिद्ध गीत, ‘द स्टोरी ऑफ वन स्काय’ चे वर्णन केले,ह्या गीतात जगातील सर्व संस्कृतींचा सन्मान करण्याचे आवाहन आहे. सगळ्या जगात विविध संस्कृतीं असल्या तरी हे जग मानवतेच्या बंधाने जोडले आहे, असा संदेशही ह्या गीतात असल्याचे, त्यांनी सांगितले.
आपल्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी आणि कीर्तीबद्दल बोलतांना, पॉप स्टार दिमाश कुदायबर्गेन म्हणाले, “संगीताची स्वतःचीच एक वेगळी भाषा असते, ती भाषांची बंधने ओलांडून प्रवास करत असते.” भारतीय आणि फ्रेंच संगीतासह सर्व प्रकारच्या संगीत ऐकत आपण कसे मोठे झालो हे त्यांनी सांगितले. सत्राचा समारोप करताना, दिमाश कुडायबर्गेनने 'डिस्को डान्सर' चित्रपटातील 'जिम्मी जिमी' या लोकप्रिय बॉलीवूड गाण्याचे सादरीकरण करून सर्व उपस्थितांना रोमांचित केले.
***
S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894386)
Visitor Counter : 165