वस्त्रोद्योग मंत्रालय

आघाडीचे कापड उत्पादक आणि संस्थांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग मिशनच्या (NTTM) पाठिंब्याने स्वदेशी धोरणात्मक आणि उच्च-मूल्य असलेली तांत्रिक वस्त्र उत्पादने विकसित करण्यासाठी एकत्र आले पाहिजे: केंद्रीय मंत्री पीयुष गोयल

Posted On: 27 JAN 2023 10:35PM by PIB Mumbai

 

वस्त्रोद्योग मंत्रालयाने स्पेशालिटी फायबर, संरक्षक वस्त्रे, उच्च-कार्यक्षमता वस्त्रे, जिओटेक्स्टाइल, वैद्यकीय वस्त्रे, शाश्वत वस्त्रे, आणि टेक्सटाइल्स सारख्या महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रांमध्ये सुमारे 32.25 कोटी रूपये किमतीच्या 15 संशोधन आणि विकास प्रकल्पांना मंजुरी दिली. या योजनेच्या सुकाणू गटाची पाचवी बैठक आज दिल्लीत केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या 15 संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये स्पेशालिटी फायबरचे 7 प्रकल्प, संरक्षणात्मक कापडाचे 2, हाय परफॉर्मन्स टेक्सटाइलचे 2, जिओटेक्स्टाइलचे 1, मेडिकल टेक्सटाइलचे 1, शाश्वत कापडाचे 1, बांधकाम साहित्यासाठी कापडाचा 1 असे प्रकल्प मंजूर करण्यात आले.

आघाडीचे कापड उत्पादक आणि संस्थांनी एनटीटीएमच्या पाठिंब्याने धोरणात्मक आणि उच्च-मूल्य असलेल्या तांत्रिक वस्त्र उत्पादनांचा स्वदेशी विकास करण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे गोयल बैठकीदरम्यान म्हणाले.

भारतातील प्रमुख टेक्सटाईल मशिनरी उत्पादन केंद्रांमध्ये यंत्रसामग्री आणि उपकरणांमधील संशोधन आणि विकास प्रस्तावांना आकर्षित करण्यासाठी ठोस प्रयत्न आवश्यक आहेत. राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत, विशेषत: शाश्वत तांत्रिक वस्त्रांच्या क्षेत्रात व्यापक वापरासाठी विद्यमान आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि वापर करण्यासाठी आंतर-मंत्रालयीय सहकार्य आवश्यक आहे. योजनेची व्यापक जागरूकता, फायदे आणि इष्टतम वापरासाठी प्रमुख संस्था आणि संशोधन संस्था यासारख्या एनटीटीएमच्या विद्यमान लाभार्थ्यांनी इतर संस्थांशी जोडले जाणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.

तरूण अभियंत्यांच्या विचारांना भारतातील तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी प्रोत्साहित करणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीनं स्टार्ट-अप योजनेंतर्गत एका विस्तृत मार्गदर्शक तत्त्वावर चर्चा करण्यात आली. त्यांनंतर महत्त्वाकांक्षी नवोन्मेषक, उद्योजक आणि तरुण शास्त्रज्ञांची प्राधान्याने अंतिम निवड केली जाऊ शकते.

तांत्रिक वस्त्रोद्योग यंत्रसामग्री आणि उपकरणे विकसित करणे हे एक मोठे आव्हान आहे ज्यासाठी विकसित मशीन्सच्या व्यापारीकरणासह सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या सहयोगी हस्तक्षेपांची आवश्यकता आहे. एनटीटीएम अंतर्गत तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रामध्ये मशिन आणि उपकरणांच्या स्वदेशी विकासासाठी सामान्य मार्गदर्शक तत्त्वे हे एक मजबूत पाऊल आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.

प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी शैक्षणिक आणि अभियांत्रिकी संस्था आणि उद्योगांना राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानांतर्गत आधीच सुरू केलेल्या शिक्षण आणि इंटर्नशिप मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्राधान्याने अर्ज करण्याचे आवाहन गोयल यांनी केले.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894235) Visitor Counter : 158


Read this release in: English , Urdu , Hindi